Pimpri_Farmer_Protest
Pimpri_Farmer_Protest 
पुणे

'हम सब एक है, मोदी-शहा फेक है!'

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ''शेतकरी-कामगार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है, मोदी-शहा फेक है, जय जवान- जय किसान,'' अशा घोषणा शेतकरी आणि कामगारांनी दिल्या आहेत. नवे शेती कायदे रद्द करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वयक समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलन संघर्ष समिती यांच्यावतीने शनिवारी (ता. 30) एक दिवसीय उपोषण सत्याग्रह करण्यात आला.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सकाळी दहा वाजता सत्याग्रहाला सुरवात झाली. ज्येष्ठ नेते मानव कांबळे, कामगार नेते कैलास कदम आणि मारुती भापकर यांनी सत्याग्रह उपोषणाचे नेतृत्व केले. यावेळी रोहित शेळके, संजय गायखे, सुरेश बेरी, अजय खराडे, ऍड. मोहन अडसूळ, विशाल जाधव, नीरज कडू, संदीप जाधव, अज्जूभाई शेख, गफूर कुरेशी, जितेंद्र वाटकर, राहुल राऊत, वंदना कांबळे, अमोल राऊत आदी उपस्थित होते. यात राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, बारा बलुतेदार महासंघ, कुरेशी असोसिएशन, ओबीसी संघर्ष समिती, मराठा सेवा संघ, प्रहार जनशक्ती पक्ष, ओबीसी संघर्ष सेना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागरी हक्क सुरक्षा समिती, महिला मजदूर संघटना, धनगर सेना आदी संघटनांनी सहभाग घेतला.

कामगार नेते कैलास कदम म्हणाले, ''शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाला. त्याचे आम्ही समर्थन करत नाही, पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.''
मानव कांबळे म्हणाले, ''महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहिंसेच्या मार्गाने एकदिवसीय आंदोलन सुरू आहे.'' तर ''मोदी सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात असमर्थ असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,'' असं मत  भापकर यांनी व्यक्त केलं.

आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया...
कोल्हापूर-कागलवरून आलेले शेतकरी श्रीपती पाटील म्हणाले, ''सरकार भ्रष्ट मार्गाने शेतकऱ्यांविरुद्ध कारवाया करत आहे.''

सटाणा-नाशिकचे शेतकरी दादाजी खैरनार म्हणाले, ''नवीन तिनही शेती कायदे रद्द केले पाहिजेत.''

थेरगावचे शेतकरी धनाजी येळकर-पाटील म्हणाले, ''मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या भल्याचे कायदे करावेत. अन्यथा आंदोलन तीव्र होईल.'

पिंपळे गुरवचे शेतकरी संदेश नवले म्हणाले, ''दोन महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत, पण त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नाही.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT