पुणे

पुणे : शेतकरी मारहाण प्रकरण; सराईतासह दोघांवर गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील बाजार आवारात एका शेतकऱ्याला मंगळवारी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोघांविरुद्ध मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भानुदास वसंत देशमुख (वय 42, रा. ता. अकोले, अहमदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सराईत गुन्हेगार राहुल लक्ष्मण बनसोडे (रा. मार्केटयार्ड) आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख हे अहमदनगरमधून लसूण विक्रीसाठी घेऊन आले होते. हा लसूण एका व्यापा-याकडे विक्रीसाठी दिला होता. त्याची पट्टी येणे बाकी असल्याने ते मार्केट यार्डमध्ये थांबले होते. त्यानंतर ते कांदा, बटाटा, लसूण विभागात गाळा नंबर 602 समोर पाणी पिण्यासाठी बाटली घेऊन गेले होते.

बाटलीतून पाणी पीत असताना बनसोडे याने विनाकारण फिर्यादी याच्या पाण्याच्या बाटलीवर फटका मारला. यामुळे फिर्यादीच्या तोंडावर आणि अंगावर पाणी सांडले. फिर्यादीने याचा जाब विचारला असता, बनसोडे व त्याच्या साथीदाराने हाताने तसेच भाजीच्या प्लास्टिकच्या कंटेनरने हातावर आणि तोंडावर मारहाण केली.

मारहाणीत फिर्यादी यांच्या तोंड, दात, डोळे तसेच डोक्‍याला दुखापत झाली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक खटके करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरच्या फिंगरप्रिंट बघायच्या आहेत : राज ठाकरे

Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT