पुणे

शेताच्या वादातून शेतकऱ्याचा खून

CD

राजगुरुनगर, ता. ५ : शेतात काम करत असणाऱ्या ज्येष्ठ शेतकरी दाम्पत्यास, शेताच्या वादातून पाच जणांनी मंगळवारी (ता. ३) जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक केली आहे.
सोपान तुकाराम भांबुरे (वय ७५, रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड) असे मृताचे नाव आहे, तर चंद्रकला सोपान भांबुरे ( वय ५८, रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती सोपान ''दरा'' नावाच्या शेतात काम करत होते. दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मुलगा रामदास शेतातून गहू घरी घेऊन गेला. तो गेल्यानंतर शेतात राहिलेल्या चंद्रकला आणि सोपान या वृद्ध दाम्पत्याकडे त्यांच्या भावकीतील शिवाजी पांडुरंग भांबुरे आणि किरण शिवाजी भांबुरे हे त्यांच्या कुटुंबातील तीन महिलांसह आले. त्यांनी ‘तुम्ही या शेतात यायचे नाही’ असे म्हणत या दाम्पत्याला शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर त्यांनी या दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या सोपान भांबुरे यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांचा मुलगा रामदास भांबुरे आणि नातू सार्थक काळूराम भांबुरे यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सोपान भांबुरे यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप शिसोदे पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

T20 WC, IND vs ENG: अक्षर पटेल मागे पळाला अन् सूर मारत अफळातून कॅच पकडला, गंभीरही खूश अन् बुमरहाचाही मोठा विक्रम

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Alandi News : आळंदी इंद्रायणी घाटावर महिलांमार्फत खुलेआम मद्यविक्री, धार्मिक स्थळांचे विडंबन

SCROLL FOR NEXT