Crime1.jpg
Crime1.jpg 
पुणे

ट्रॅक्‍टर खरेदीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : ट्रॅक्‍टर खरेदीच्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या भांडणातून ग्राहक असलेल्या शेतकऱ्याला डोक्‍यात लोखंडी पाइप मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी बालाजी ट्रॅक्‍टर शोरूमचे मालक संतोष भुजबळ व योगेश भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांनी दिली. 

या घटनेत शेतकरी सिद्धार्थ सुरेश मंडलिक (वय 27, रा. बेलसर, ता. जुन्नर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक गुंड म्हणाले, "सिद्धार्थ मंडलिक यांनी नारायणगाव येथील बालाजी ट्रॅक्‍टर शोरूमचे मालक संतोष भुजबळ व योगेश भुजबळ यांच्याकडून मिनी ट्रॅक्‍टर खरेदी केला होता. ट्रॅक्‍टर खरेदीचा आर्थिक व्यवहार व कागदपत्रे आदींची पूर्तता करण्यासाठी शनिवारी (ता. 26) दुपारी मंडलिक हे नातेवाइकांसह बालाजी ट्रॅक्‍टर शोरूम मध्ये आले होते.

यावेळी आर्थिक व्यवहार व कागदपत्रांची पूर्तता यावरून वाद झाला. या वादातून संतोष भुजबळ यांनी मंडलिक यांच्या डोक्‍यात लोखंडी पाइप मारला. त्यानंतर योगेश भुजबळ यांनी त्याच लोखंडी पाइपने मंडलिक यांना मारहाण केली. या मारहाणीत मंडलिक हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करून दोघांना आज अटक केली. आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता जुन्नर न्यायालयाने आरोपींचा जमीन मंजूर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT