आरती अशोक फराटे sakal
पुणे

शेतकर्‍याची मुलगी बनली सनदी लेखापाल, आरती फराटे हिचे सी.ए. परीक्षेत यश

मांडवगण फराटा गावातून पहिली सनदी लेखापाल होण्याचा मान आरती फराटे हिने मिळविला

सकाळ वृत्तसेवा

मांडवगण फराटा: येथील शेतकरी कुटुंबातील आरती अशोक फराटे हिने सनदी लेखापाल, सी. ए. परीक्षेत यश मिळवले आहे.आरती हीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील बी. एम. सी. सी. महाविद्यालयात झाले. दहावीला ९२ टक्के गुण मिळाल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांनी तिला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र बहिण पूजा हिच्या सल्याने आरतीने अकरावी साठी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. दरम्यान पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना चार्टर्ड अकाउंटंट सी. ए. ची परीक्षा देण्याचे मनाशी ठरवले व त्या दृष्टीने दररोज दहा ते बारा तास अभ्यास सुरू केला व चौथ्या प्रयत्नात मला हे यश मिळाले. असे आरती फराटे हिने सांगितले.

मांडवगण फराटा गावातून पहिली सनदी लेखापाल होण्याचा मान आरती फराटे हिने मिळविला. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत तसेच येथील श्री वसंतराव फराटे पाटील महाविद्यालयात तिचा विशेष सत्कार करण्यात आला. या समारंभास महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, मृणाल फराटे पाटील, वाघेश्वर विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक एस. टी. गद्रे, उपमुख्याध्यापक सुनील थोरात, पर्यवेक्षक प्रमोद बाऊसकर, उपसरपंच सुभाष पाटील फराटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

मांडवगण फराटा, ता. शिरूर : सनदी लेखापाल परीक्षेत यश मिळविलेल्या आरती फराटे हिचे अभिनंदन करताना दादा पाटील फराटे सोबत आई, वडील व कुटुंबीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT