पुणे

इंदापूर तालुक्यात शेतकरी पिता-पुत्राचा कोरोनाने मृत्यू

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : मदनवाडी (ता.इंदापुर) येथील पिता पुत्राचा कोरोनामुळे मृ्त्यू झाला आहे. शेतकरी कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे मदनवाडीवर शोककळा पसरली तर ही माहिती समजताच अनेकांना धक्का बसला. संपत शंकर सकुंडे(वय.७२) व दिलीप संपत सकुंडे(वय.५२) अशी कोरोनामुळे मयत झालेल्या पिता पुत्राची नावे आहे.

याबाबत निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार मदनवाडी (ता.इंदापुर) येथील संपत सकुंडे व दिलीप सकुंडे या पिता पुत्रास पंधरा दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ऑक्सिजनस्तर कमी असल्यामुळे कुटुंबियांनी ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी मोठी धावधाव केली होती. अखेर त्यांना वालचंदनगर येथील एका खासगी कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला. दरम्यानच्या काळात दोघांचेही आरोग्य खालावले होते. तीन दिवसांपूर्वी दिलीप संपत सकुंडे यांचा मृत्यू झाला व त्यानंतर त्यांचे वडिल संपत सकुंडे याचाही कोरोनामुळे दुदैवी मृत्यू झाला आहे.

शेतकरी कुटुंबातील पिता पुत्राच्या मृत्यूची बातमी समजताच मदनवाडीकरांना धक्का बसला असून गावावर शोककळा पसरली. एकत्र कुटुंब पध्दतीचे सकुंडे कुटुंबीय हे मदनवाडीतील प्रगतशील बागायतदार कुटुंब म्हणून सर्वपरिचित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणे मेट्रोचा मोठा निर्णय! बंद असलेले गेट्स आता पूर्वीसारखे उघडणार नाहीत; मंगळवारी वेळेत बदल

Police Action: धूलिवंदनला कायद्याचा कडक पहारा! उल्हासनगर पोलिस सतर्क; समाजकंटकांवर राहणार करडी नजर

Latest Marathi News Live Update : दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांना मंत्री गिरीश महाजनांचा फोन, परिस्थितीची घेतली माहिती

जगावर घोंगावतंय महायुद्धाचं संकट! Baba Vanga यांनी दशकांपूर्वीच केली होती भीषण युद्धाची भविष्यवाणी; सध्याच्या घटनांशी जुळतंय का भाकीत?

IND vs ENG: २ पराभव अन्... ! भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या आकडे कोणाच्या बाजूने

SCROLL FOR NEXT