पुणे

वाई:-शेतकऱ्याची फसवणूक करून ट्रॅक्टर नेणाऱ्या संशयितास वाई पोलिसांनी केली अटक

CD

शेतकऱ्याच्या फसवणूकप्रकरणी एजंटास अटक

वाई पोलिसांची कारवाई; दहा लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत

वाई, ता. २७ : शेतकऱ्याची फसवणूक करून ट्रॅक्टर घेऊन फरारी झालेल्या संशयिताला वाई पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १० लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली. अजय संतोष चव्हाण (वय २३, रा. सरताळे, ता. जावळी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी निखिल धुमाळ  (रा. नायगाव, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजय चव्हाण हा सहा डिसेंबर २०२४ ते  तीन जानेवारी २०२६ रोजीच्या दरम्यान सोनगीरवाडी येथे नोटरी करून फिर्यादी निखिल धुमाळ  यांचा ट्रॅक्टर (एमएच ११ डीएव्ही ४५१४) तसेच शेतकरी प्रशांत बबन सोळस्कर याचा नवीन ट्रॅक्टर (एमएच ११ डीएन ९५२४) फिर्यादी धुमाळ व त्यांच्या मित्रांना विश्वासात घेऊन प्रत्येक महिन्याला ३० हजार रुपये भाडे देणार असल्याचे सांगून घेऊन गेला होता. त्यानंतर ट्रॅक्टर कंपनीत भाडेतत्त्वावर लावले आहेत, असे खोटे सांगून संशयित अजय चव्हाण मोबाईल बंद करून फरारी झाला होता.
याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
त्यानंतर तपास पथकाने संशयितास अटक करून त्याच्याकडून फसवणूक करून नेलेले १० लाख किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत केले आणि शेतकऱ्यांना परत केले. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी करीत आहेत.
या कारवाईत पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, अंमलदार  नितीन कदम, हेमंत शिंदे, स्नेहल सोनावणे, विक्रम धोत्रे, श्रावण राठोड, विशाल शिंदे यांनी सहभाग घेतला.
-------------------------------------
07633
वाई : संशयिताकडून पोलिसांनी  ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर.
-------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Rashmika wedding: ना पुरोहित , ना अग्नि; तरीही पवित्र! जाणून घ्या रश्मिका–विजयच्या कोडावा पद्धतीतील विवाहसोहळ्यामागील अनोख्या परंपरा

Silver Buying Tips : ऑनलाइन सिल्वर ज्वेलरी खरेदी करताय? मग बनावट चांदीपासून राहा सावध, आत्ताच पाहा फेक ओळखायच्या 'या' 5 ट्रिक्स

Akola News : स्मार्ट मीटरचा पातूर पोलीस स्टेशनला दणका; चार महिन्यांचे ५२ हजार रुपये बिल थकीत, वीजपुरवठा खंडित

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT