पुणे

‘फार्मर ग्रुप लीग’ स्पर्धेत वाशीम जिल्ह्यातील शेतकरी गटांनी सहभागी व्हावे

CD

‘फार्मर ग्रुप लीग’ स्पर्धेत सहभाग घ्यावा
वाशीम जिल्ह्यातील शेतकरी गटांना कृषी विभागाचे आवाहन

वाशीम ः जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘फार्मर ग्रुप लीग’ स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकरी गटांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. शेतकरी ग्रुप लीगच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येऊन प्रगत तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि डिजिटल शेतीचा वापर करण्याची संधी उपलब्ध होणार असून, त्यातून उत्पादनवाढीसह आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.
‘ज्ञान, तंत्रज्ञान, एकता आणि शाश्वत शेती’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेली ही स्पर्धा वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानास्पद पाऊल मानली जात आहे. या उपक्रमामुळे केवळ स्पर्धात्मक वातावरण निर्माण न होता, शेतकऱ्यांना एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याची आणि आधुनिक शेती तंत्र आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेचे चार मुख्य स्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये कृषी तंत्रज्ञान विस्तारांतर्गत आधुनिक यंत्रसामग्री व सुधारित बियाणांचा प्रसार करण्यात येणार आहे. क्षमता बांधणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गट पातळीवर प्रशिक्षित करून त्यांचे संघटन मजबूत करण्यात येणार आहे. डिजिटल शेती अंतर्गत मोबाईल अॅप्स व ऑनलाइन बाजारपेठेचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतींना प्राधान्य देऊन जमिनीचा पोत सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागातर्फे करण्यात आले असून ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी वाशीम उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ९१८५२३७००४ / ९१८५२३७००३ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT