पुणे

ओंकार हत्तीला घाबरून पळताना शेतकरी जखमी,हत्तीकडुन गाड्यांचे नुकसान,

CD

ओंकार हत्तीला घाबरून
पळताना शेतकरी जखमी

गोव्यातून परतलेल्या हत्तीने वाहनांचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती

ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी ः गोव्याची सीमा ओलांडून सिंधुदुर्गात पुन्हा आलेल्या ओंकार हत्तीला घाबरून पळताना डिंगणे-पालयेकरवाडी (ता. दोडामार्ग) येथील वृद्ध शेतकरी भिवा परब जखमी झाले. बुधवारी (ता. २७) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. हत्तीने आतापर्यंत अनेक वाहनांचे नुकसान केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सिंधुदुर्गात काही दिवस मुक्काम केल्यानंतर ओंकार हत्ती पाच-सहा दिवसांपूर्वी गोव्यात गेला होता. तो मोपापर्यंत पोहोचला होता. मात्र गोवा वनविभागाने त्याला पुन्हा सिंधुदुर्गच्या दिशेने हुसकावून लावले. त्यानंतर हत्ती आक्रमक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याने अनेक वाहनांचे नुकसान केले आहे.
बुधवारी दुपारी डिंगणे-पालयेकरवाडी येथे भिवा परब बागेत काम करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक त्यांच्यासमोर ओंकार हत्ती आला. हत्तीला पाहून घाबरलेल्या परब यांनी पळण्याचा प्रयत्न केला. या वेळी ते जमिनीवर कोसळल्याने जखमी झाले. मात्र हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला नाही.
या घटनेनंतर स्थानिक शेतकऱ्यांनी ओंकार हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच हत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना भरपाई द्यावी, अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT