farmer left Animals in cauliflower Farm due to low market price 
पुणे

.....म्हणुन शेतकऱ्यांनी चक्क स्वत:च्या शेतात सोडली जनावरे

सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : पालेभाज्यांबरोबर तरकारी मालाचेही बाजारभाव गडगडल्याने मजुरीही सुटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी फ्लावरच्या शेतात अक्षरश: जनावरे सोडुन दिली आहे. यावर्षी अतिपावसामुळे कांद्याची रोपे नष्ट झाली त्याचबरोबर बटाटा बियाणेचेही बाजारभाव गगनाला भिडल्याने कांदा व बटाटा लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. 

आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील जारकरवाडी, पोंदेवाडी, काठापुर बुद्रुक, देवगाव, लाखणगाव, पारगाव, मेंगडेवाडी, खडकवाडी  परिसरातील शेतकरी तरकारी पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला. यावर्षी पाऊस चांगला झाला हवामानही पोषक असल्याने तरकारी मालांची वाढही जोरात झाली उत्पादन वाढल्याने बाजारात आवक वाढली त्यामुळे तरकारी मालाचे भाव गडगडले आहे.

प्रती दहा किलोचे बाजारभाव पुढील प्रमाणे
काकडी 10 ते 70 रुपये
दोडका 10 ते 180 रुपये 
फ्लावर 10 ते 40 रुपये 
गवार 40 ते 430 रुपये 
ढोबळी मिरची 50 ते 200 रुपये
भेंडी 50 ते 320 रुपये
हिरवी मिरची 100 ते 450 रुपये
वालवड 100 ते 150 रुपये


बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. मजुरीही सुटत नसल्याने फ्लावर उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी योग्य झालेल्या फ्लावरच्या शेतात जनावरे सोडून दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT