बिले रखडल्याने शेतकरी आक्रमक
वरखेडमधील हनुमान मंदिरात उपोषण सुरु
चापडगाव, ता. ६ ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समितीमार्फत मंजूर झालेल्या विहिरी व गायगोठ्यांची कामे शेतकऱ्यांनी स्वखर्चाने पूर्ण करूनही तब्बल तीन वर्षांपासून संबंधित अनुदानाची बिले रखडली आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही बिले कधी मिळणार, याबाबत प्रशासनाकडून ठोस माहिती दिली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वरखेड (ता. शेवगाव) येथील शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून विहीर व गायगोठा मंजूर झाले होते. मंजूर कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी खर्च केला. मात्र, कामे पूर्ण होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप संबंधित बिले अदा करण्यात आलेली नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी पंचायत समितीमध्ये वारंवार चौकशी करून पाठपुरावा केला. मात्र, बिले नेमकी कधी मिळतील, याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वरखेड येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात बिभीषण संताराम काळे यांनी सोमवार (ता. ५)पासून उपोषण सुरू केले आहे. रखडलेली बिले तातडीने अदा करावीत,अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, वरखेड गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरी, गायगोठा तसेच घरकुल योजनेतील प्रलंबित बिले तातडीने अदा करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने उपोषणाची तातडीने दखल घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.