farmer strike against electric supply of bhabhleshwar kadus mumbai pune
farmer strike against electric supply of bhabhleshwar kadus mumbai pune sakal
पुणे

Pune : बाभळेश्वर - कडुस विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिणीच्या भूसंपादनाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : बाभळेश्वर - कडुस(मुंबई ) कडे जाणा-या विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही.अति.उच्च वाहिणीच्या टॉवरच्या बांधकामाचे काम शेतक-यांनी बंद पाडले यासंर्दभाची माहिती देताना येथील शेतक-यांणी सांगितले की या ठिकाणाहुन टॉवर होऊ नये यासाठी गेल्या १० वर्षांपासून जिल्हा सत्र न्यायलय राजगुरूनगर येथे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

सदर प्रकरणी कोर्टात शेतकरी दाद मागत असुन जमिनींचे वेळोवेळी होणारे भूसंपादनास शेतकरी कंटाळला असुन या अगोदर पिंपळगाव जोगा कालवा तसेच त्याच्या चा-या , पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे संपादन, रस्ते महामार्ग रूंदीकरण यासाठी संपादन वेळोवेळी होत आहे.त्यात टाँवर लाईनचे भूसंपादन न परवडणारे आहे.तरी याबाबत येथील शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले होते.

यावेळी भाजपा गटनेत्या आशा बुचके, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे , आळे गावचे उपसरपंच ॲड विजय कु-हाडे, मंगेश अण्णा काकडे, गणेश गुंजाळ, अरूण हुलवळे,अविनाश कु-हाडे, जयराम भुजबळ, गणेश शिंदे, राहुल तितर, सुजित कु-हाडे, निलेश भुजबळ, परशुराम कु-हाडे,

शरद आरोटे, संजय गुजाळ, संजय कु-हाडे, संजय हूलवळे, सुरेखा हुलवळे, कमल हुलवळे, मनिषा हुलवळे, सीमा हुलवळे, संगीता हुलवळे, रेखा हुलवळे, अजिंक्य हुलवळे संदीप हुलवळे,कारभारी हलवळे,गेनभाऊ हुलवळे ,

प्रकाश हुलवळे आदी शेतकरी उपस्थित होते.जवळपास २७ शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारे हे हाय व्हॉलटेज लाईनचे भूसंपादन शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढीव मोबदला जरी मिळाला तरी माघार घेणार नाही भूसंपादन होऊ देणार नाही असा संतप्त पीडित शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला.

यावेळी महापारेषणतर्फे उच्च पदस्थ इंजिनिअर्स, प्रांताधिकारी गोविंद शिंदे , उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, आळेफाटा पोलीस निरीक्षक नलावडे, ओतूर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांणी दिलेल्या सुचना नुसार सोमवार दि.१२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पीडित शेतकरी, महापारेषन अधिकारी यांची समनव्यक बैठकीचे तातडीने आयोजन करण्यात आले आहे

-ॲड. विजय कु-हाडे उपसरपंच

पीडित शेतकऱ्यांच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे व आळे गाव उपसरपंच विजय कुऱ्हाडे यांनी महापारेषण च्या उच्च पदस्थ इंजिनिअर्सला नव्याने सर्वेक्षण केलेल्या बागायती शेतीचे भूसंपादन न करता जुन्या सर्व्हे झालेल्या कोरडवाहू शेतातुन भूसंपादन करून त्यात ४०० के व्ही अति उच्च वाहक विद्युतवाहिनी करण्यात यावी अशी ठाम मागणी केली.रेडिकनेटर दराच्या १० पट मोबदला जरी दिला तरी भूसंपादन होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला.जी एम आर टी च्या परवानगीबाबत शहानिशा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT