शेतकरी आत्महत्येची
आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र
१४ प्रकरणे अपात्र; जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांची पात्रता निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत २२ प्रकरणांवर विचार करण्यात आला. त्यापैकी आठ प्रकरणे शासनाच्या आर्थिक मदतीसाठी पात्र, तर १४ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. पात्र ठरलेल्या कुटुंबीयांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सततची नापिकी, सावकार व बँकांचे कर्ज, वाढता लागवड खर्च आणि उत्पादनाच्या तुलनेत मिळणारे अपुरे उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण होते. अशा परिस्थितीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी शासनाच्या निकषांनुसार प्रकरणांची छाननी करून पात्रता निश्चित केली जाते.
पात्र ठरलेली प्रकरणे
बैठकीत होमेश ललित काळे (वय २६, सैदापूर, ता. मूर्तिजापूर), पंजाब जानराव बोरोडे (वय ५३, वडाळी देशमुख, ता. अकोट), मनीष केशव थुटे (वय ३५, उमरा, ता. अकोट), राजू ग्यानु राठोड (वय ५६, लोहगड, ता. बार्शीटाकळी), वैष्णवी गणेश श्रीनाथ (वय २०, निंभोरा, ता. अकोला), रवींद्र रामदास सांगुनवेडे (वय ४४, खंडाळा, ता. तेल्हारा), संगिता राजेंद्र पखान (वय ५३, जैनपूर पिंप्री, ता. अकोट) आणि महादेव मोतिराम उन्हाळे (वय ४८, खंडाळा, ता. बाळापूर) यांची प्रकरणे पात्र ठरविण्यात आली.
अकोला तालुक्यात
सर्वाधिक आत्महत्या
जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी अकोला तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०२४ मध्ये ४३, २०२५ मध्ये ४०, तर ३१ मार्च २०२६ अखेर १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. १ जानेवारी २००१ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अकोला तालुक्यात सर्वाधिक ७६५ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूरच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.