fie.jpg 
पुणे

'नऊ ऑगस्ट "शेतकरी मुक्ती दिन' म्हणून देशभरातील शेतकरी साजरा करणार' 

सकाळवृत्तसेवा

पुणे : नऊ ऑगस्ट (क्रांती दिन) अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने "किसान मुक्ती दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील शेतकरी त्या दिवशी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मागण्यांचे निवदेन देणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशाच्या जवळपास सर्व राज्यांतील 250 हून अधिक शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी संघटना यात सक्रिय सहभागी होणार आहेत. आपल्या प्रमुख नऊ मागण्यांसाठी त्या दिवशी राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने व बैठा सत्याग्रह करतील असेही शेट्टी व पाटकर यांनी आज झूम ऍपद्वारा आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. नऊ ऑगस्टला महात्मा गांधीजींनी देशाला "चले जाव'चा मंत्र दिला. त्यामुळे याच दिवशी देशातील सर्व शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी कामगार अ "कॉर्पोरेट भगाओ,किसान बचाओ" ही महत्त्वाची घोषणा करतील, असेही ते म्हणाले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 केंद्र सरकारने पाच जून रोजी काढले आदेश तत्काळ मागे घ्यावेत. अध्यादेश शेतकरी विरोधी आहेत. यामुळे शेतीमालाच्या किंमत कमी होतील आणि बी-बियाण्यांची सुरक्षितता संपुष्टात येणार आहे. संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक आणि उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा विधेयक दोन्ही तत्काळ मंजूर करावीत. दूध उत्पादकांना पर लिटर अनुदान द्यावे. दुधभुकटी मका,पामतेल आयात करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा.डिझेलचे दर तातडीने पन्नास टक्‍क्‍यांनी कमी करावेत. लॉकडाऊनच्या काळातील शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे. यासह विविध समितीच्या प्रमुख मागण्या आहे, असेही ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT