LEOPARD 
पुणे

बाप रे, बारा वर्षांच्या मुलीसमोर आला बिबट्या...

विवेक शिंदे

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील घोडेकरमळा व पाटीलवस्ती येथे दोन ते तीन बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सान्वी हरिश चासकर (वय १२) या मुलीवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच, याच परिसरात मेंढीवर हल्ला करुन तिला बिबट्याने ठार केले. पशुधनावर वारंवार हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. वनविभागाने त्वरीत पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी. अन्यथा वनखात्याच्या कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
     
महाळुंगे पडवळ येथे घोडेकरमळा व पाटीलवस्तीवर गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा नेहमीच वावर आहे. बुधवारी (ता. २) रात्री घोडेकरमळा वस्तीकडे हरिश चासकर, मुलगी सान्वी व मुलगा यशराज हे जात होते. सर्वात पुढे सान्वी होती. अचानकपणे अंधारातून काहीतरी चमकत असल्याचे प्रकाशात पाहिले असता समोर ५०० फुटांवर बिबट्या दिसला. तिच्या अंगावर झेप टाकणार तेवढ्यात हरिश चासकर यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत बिबट्या एका जागेवरच थांबला होता. नागरिकांची चाहूल लागताच बिबट्याने उसाच्या शेतात धुम ठोकली. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशीच आमची परिस्थिती झाल्याचे हरिश चासकर यांनी सांगितले.

दौलत माने या मेंढपाळाच्या कळपावर दोन दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून एक मेंढी ठार केली आहे. तसेच, दत्तात्रेय सावळेराम चासकर यांच्या सात फूट संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन बिबट्याने कुत्रे व एका गाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु चासकर यांच्या सतर्कतेमुळे कुत्रे व गाईचा जीव वाचला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत दुध व्यवसायातून कसेबसे शेतकरी कुटूंबीय उदरनिर्वाह करत आहेत. परंतु, पशुधनावरच बिबट्याने वारंवार हल्ले केल्याने येथील शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. 

पशुधनावर वारंवार हल्ले होत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडे वारंवार मागणी केली. परंतु, अद्यापही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला नाही. येत्या दोन दिवसात पिंजऱ्याची व्यवस्था केली नाही, तर जुन्नर वनविभाग कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन केले जाईल.
 - बाबाजी चासकर, अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान  
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Case : निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एन्ट्री; जमीन व्यवहारातील कोट्यवधींच्या उलाढालीचा तपास होण्याची शक्यता

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार संकटात? 'नोव्हेंबर क्रांती'च्या चर्चांना वेग, डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार?

Chandrakant Khaire: पवार काँग्रेस सोडून ठाकरेंसोबत येतील; चंद्रकांत खैरेंनी सकाळ कार्यालयात केले अनेक गौप्यस्फोट..

सरकारची 'भारत टॅक्सी' सेवा, पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू; प्रवासी आणि चालकांनाही होणार फायदा

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन; माजी मंत्री बच्चू कडू शेतकरी नेत्यांसह आज सरकारसोबत चर्चा करणार?

SCROLL FOR NEXT