पुणे

पॅालिहाऊस शेतीबाबत शिरूरमधील शेतकरी म्हणतात...

युनूस तांबोळी

टाकळी हाजी : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लॅाकडाऊनच्या शक्यतेने पॅालिहाऊस शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. लॅाकडाऊनमुळे फुलांची हायटेक शेती संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आधुनिक शेतीकडे वळालेला तरूण शेतकरी बॅंक कर्जाच्या ओझ्याखाली दबला जाऊन उद्ध्वस्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मार्च 2020 मध्ये लग्नसराईचा हंगाम सुरू होणार होता. या दरम्यान चांगले वातावरण व उत्तम नियोजन यामुळे पॅालिहाऊसमध्ये तयार केलेल्या फुल शेतीला चांगले उत्पादन मिळणार होते. गुलाब, जरबेरीया या उत्पादीत मालाला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने तरूण शेतकऱ्यांनी कंबर कसली होती. पंरतू कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाने लॅाकडाऊन जाहिर केले. अगोदर तीन दिवस व नंतर अनपेक्षीत काळात झालेले लॅाकडाऊन या पॅालिहाऊस धारकांना चांगलाच झटका देऊन गेले.

कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली. लग्नकार्य, रिसेप्शन यांना बंदी घालण्यात आली. फुलांची मागणी बंद झाली. आर्थिक उलाढाल थांबली गेल्याने पॅालिहाऊस शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. बॅंकचे हप्ते थकीत होत गेल्याने कर्जाचा बोजा वाढला गेला. पॅालिहाऊस मधून दररोज निघणारी फुले उकीरड्यावर टाकून दिली. दहा महिन्यांच्या या लॅाकडाऊनमध्ये खते, औषधे, मजूरी यासाठी लागणारा खर्च त्यातून ही फुलशेती संकटात आली. 

कोरोना काही दिवसांतच नाहिसा होणार अशी आशा होती. लॅाकडाऊन संपल्यानंतर कसेतरी पंधरा दिवस फुलांचा बाजार सुरू राहिला. पण पॅालिहाऊसमध्ये उत्पादन घेणारा तरूण शेतकरी संकटात सापडला. सार्वजनीक कार्यक्रमावर बंदी व साध्या पद्धतीने लग्न कार्य यामुळे अधिकच संकट ओढावले गेले. त्यामुळे अनके शेतकऱ्यांनी फुलांची झाडे उपसून फेकून दिली. 

अंदाजे सरासरी उत्पन्न
2015 ः 4.5 लाख
2016 ः 4 लाख
2017  ः 2.5 लाख
2018 ः 3.5 लाख 
2019  ः 4.5 लाख 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे मोठ्या प्रमाणात पॅालिहाऊसमधून फुलशेती केली जात होती. लॅाकडाऊनमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी फुलांची शेती बंद केली आहे. मात्र लॅाकडाऊन नंतर तरूण शेतकऱ्यांनी काकडी, मिरचीची शेती पॅालिहाऊसमध्ये करू लागले आहेत. सध्या त्यांच्या या पॅालिहाऊसमध्ये काकडी व मिरची पिकाला बहर आला आहे. मात्र पुन्हा लॅाकडाऊन झाल्यास बाजारभावा अभावी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात तोट्यात जाणार आहे.-अरूण मुंजाळ, शेतकरी कवठे येमाई

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT