पुणे

पुणे : पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल

जयदीप हिरवे

सातगाव पठार : सातगाव पठार ता.आंबेगाव भागात बटाटा पिकाबरोबरच शेतकऱ्यांनी भुईमूग पीकदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस नसल्याने उष्णता वाढली व किडीचा प्रादुर्भाव भुईमूग पिकाला झाल्याने फवारणीची कामे सुरु झाली आहेत. 

गेले काही दिवसांपासून कडक ऊन वाढले आहे. शेतकरी वर्ग अत्यंत अडचणीत आला आहे.120 रुपये प्रति किलो बाजारभावाने शेंगदाणा बियाणे घेऊन पेरणी केली आहे. खुरपणी करताना मजूर कोरोना मुळे कामाला येत नाहीत. फार दयनीय अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. खते, औषधे महाग झाल्याने व जवळचा पैसा संपल्याने आता हातातोंडाशी आलेले बटाटा, भुईमूग, वाटाणा पीक उन्हापासून टिकाव धरू शकत नसल्याने पाऊस कधी पडतो या एका आशेवर पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दिलेला प्रचंड ताण दिल्याने बटाटा ,भुईमूग, सोयाबीन, वाटाणा, फरशी आदी पिके संकटात असुन शेतकऱ्यांनी तुषार सिंचन सुविधा केली असून खुरपणी अंतिम टप्प्यात आहे.

भुईमूग पिकात तणनाशक फवारणी करत असून, भुईमूग पीक फुलोऱ्यात असून पाऊस येत्या ५ -६ दिवसात न झाल्यास पिक जळुन जाण्याची भीतीही व्यक्त केली आहे. पावसाळा असून सुद्धा  दिवसभर ढगाळ वातावरण न राहता उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत आहे. परीणामी जमीनीतील ओलावा कमी होत चालला असुन उत्पादन घटण्याची शक्यता जास्त असल्याचे शेतकरी शरद पवळे, नितीन तोत्रे, महमूद पटेल, मंगेश रागमहाले आदी शेतकऱ्यांनी  सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MH-12 RTO: पुण्याचा 'MH-12' नंबर इतिहासजमा होणार? RTO चा मोठा प्लॅन तयार; नवीन वाहनांना कोणता नंबर मिळणार?

Ajinkya Rahane: अजिंक्य निवृत्तीने कोलकाता नाइट रायडर्सचा भार हलका केला; IPL 2027 साठी फ्रँचायझी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Parliament canteen: संसदेच्या कँटीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण? विविध पदार्थांचे दर काय? व्हेज-नॉनव्हेज थाळ्यांच्याही किंमती वाढल्या

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Mumbai News: जुहू समुद्रकिनाऱ्यावर यांत्रिक जाळी, सागरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT