well sakal
पुणे

Otur News : खामुंडीतील शेतकऱ्याच्या बैलाचा विहिरीत पडून मृत्यू

खामुंडी, ता. जुन्नर येथील शेतकरी दिपक ज्ञानेश्वर कोकाटे यांचा बैल गाडीला जुंपलेला बैल गाडीसह कठडा नसलेल्या विहित पडून ठार झाला.

पराग जगताप

ओतूर - खामुंडी, ता. जुन्नर येथील शेतकरी दिपक ज्ञानेश्वर कोकाटे यांचा बैल गाडीला जुंपलेला बैल गाडीसह कठडा नसलेल्या विहित पडून ठार झाला.

खामुंडी येथील सोमनाथ नगर परीसरातील तेलदरा शिवारात त्याचा मुलगा प्रणव कोकाटे आपल्या जनावरांना चारा आनण्यासाठी त्यांची एक बैलाची बैलगाडी घेऊन बुधवारी सायंकाळी गेला होता.जनावरांचा चारा बैल गाडीत घेऊन परतताना अचानक बैलाने कशाला तरी घाबरून मुसंडी मारली.

बैलाने मुसंडी मारल्याने बैल हा बैल गाडीसह जवळच असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. प्रणव ने प्रसंगावधान दाखवून बैलगाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे.

सदर घटना कळताच सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांनी यांनी आळेफाटा येथील महालक्ष्मी क्रेनचे मालक किरण पुरी यांना संपर्क करून क्रेन बोलावले रात्री उशीरा दिपक कोकाटे व बाबू कोकाटे यांनी क्रेनच्या सहाय्याने खाली विहिरीत ५० ते ६० फुट उतरून खामुंडी गावातील तरुणांच्या मदतीने अथक प्रयत्न करून बैलाचा मृतदेह आणी बैलगाडी रात्री १.३० च्या सुमारास विहिरीच्या बाहेर काढण्यात यश मिळवले.

सदर शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याने त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पिडित शेतकर्याला आर्थिक भरपाई किंवा बैल शासना कडून किंवा सामाजिक संघटना कडून मिळावा अशी मागणी परीसरातील शेतकरी करत असून सदर घटने बाबत शेतकरी वर्गातून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT