पुणे

बाधीत शेतकय्राना मोबादला देण्यास सौर कंपन्यांकडून चालढकल

CD

जमिनी घेतल्या, वीजवाहिन्या टाकल्या; भरपाई मात्र रखडली

मंगळवेढा, ता. १४ : टॉवर उभारणीसाठी जमिनी घेतल्या, शेतातून वीजवाहिन्या नेल्या; मात्र ठरलेला मोबदला अद्याप न मिळाल्याने भाळवणी परिसरातील बाधित शेतकरी खासगी सौर कंपन्यांविरोधात आक्रमक झाले आहेत.

भाळवणी परिसरात महापारेषणचे १३२ केव्ही उपकेंद्र असल्याने या भागात अनेक खासगी कंपन्या सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढे आल्या आहेत. कंपन्यांमधील स्पर्धेमुळे परिसरातील जमिनींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही कंपन्यांनी जमिनी भाडेकराराने घेतल्या, तर काहींनी थेट खरेदी व्यवहार केले आहेत.
दरम्यान, प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन सपाटीकरणामुळे भूजल पातळी कमी झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ तसेच ‘जलयुक्त शिवार’ योजनेतील अनेक कामे बुजविल्याने ग्रामसभेत काही कंपन्यांना परवानगी देऊ नये, असे ठरावही करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सध्या संबंधित कंपन्यांनी टॉवर उभारणीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. यावेळी निश्चित करण्यात आलेला मोबदला देण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मोबदल्यावरून विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून पोलिस बंदोबस्तात व राजकीय दबावाखाली वीजवाहिन्या टाकण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या कामामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कंपनीचे प्रतिनिधी दूरध्वनी उचलत नसून, ‘कार्यालयात येऊन भेटा’ अशी उत्तरे देत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोपही बाधित शेतकऱ्यांनी केला. तर कंपनीकडून संबंधित करार इतर अधिकाऱ्यांचा असल्याचे सांगून जबाबदारी झटकली जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कंपन्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

- माझ्या शेतातून झालेल्या पीक नुकसानीसाठी तीन लाखांची भरपाई निश्चित केली. त्यापैकी दोन लाख दिले उर्वरित एक लाखासाठी वारंवार हेलपाटे घातले परंतु कंपनी देण्याचे नाव काढेना व ज्यांनी करार केला ते अधिकारी फोन उचलत नाहीत.
- महादेव चौगुले, बाधित शेतकरी
------
- ऑक्टोबर महिन्यात कंपनीने मनमानी पद्धतीने सपाटीकरण केल्यामुळे पावसाच्या पाण्याने आमच्या शेती पिकाचे नुकसान झाले. परंतु कंपनी भरपाई देण्याकडे मात्र चालढकल करीत आहे.
- विद्या गेजगे, बाधित शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe: राष्ट्रवादीचा 'आनंद' दुरावला! परांजपेंनी पक्षाला रामराम ठोकला; पण तडकाफडकी निर्णय नेमका का घेतला?

IPL 2026 : जेमी ओव्हरटनची माघार, CSK च्या संघात दाखल झाला दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक ऑलराऊंडर! शेवटच्या टप्प्यात मजा येणार

WPI Inflation: महागाईचा स्पोट! घाऊक दर 42 महिन्यांच्या उच्चांकावर; पेट्रोल-गॅसच्या किमतींनी वाढवला दबाव

"त्या एका गोष्टीसाठी मी थांबले..."; सैफपासून वेगळं झाल्यावर अमृता सिंह का राहिली अविवाहित? म्हणाली-

Breaking: वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड, तिलक वर्मा कॅप्टन! तिरंगी मालिकेसाठी संघ जाहीर

SCROLL FOR NEXT