पुणे

शेतकरी गटाचे सहकारी पतसंस्थेत रूपांतर

CD

सोमेश्वरनगर, ता. १२ : करंजे व करंजेपूल (ता. बारामती) येथील ऐंशी शेतकऱ्यांनी सात वर्षांपूर्वी एकत्र येत शेतकरी बचत गट काढला होता. शंभर टक्के वसूल असणारा या शेतकरी गटाचे भागभांडवल वीस लाखांवर तर ठेवी चार लाखांवर पोहोचल्या आहेत. व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने अखेर सहायक निबंधकांच्या परवानगीने या शेतकरी बचत गटाचे रूपांतर सहकारी पतसंस्थेत करण्यात आले आहे.
निवृत्त शिक्षक संभाजी गायकवाड व ज्येष्ठ शेतकरी प्रकाश हुंबरे यांच्या पुढाकाराने २०१९ मध्ये करंजे व करंजेपूल गावच्या अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येत राजर्षी शाहू महाराज शेतकरी बचत गट स्थापन केला. अत्यंत सामान्य परिस्थितीतील या शेतकऱ्यांनी गेली सात वर्षे दरमहा शंभर टक्के भरणा आणि शंभर टक्के वसूल ही परंपरा प्रामाणिकपणे पाळली. त्यामुळे एकही शेतकरी सात वर्षात गळाला नाही. गरजूंना शेतीच्या भांडवलासाठी, वैद्यकीय कारणांसाठी दोन लाखांची तातडीची मदत होऊ शकली. सुरवातीला दोन वर्षे एकोणिस टक्के आणि गेली पाच वर्षे दहा टक्के लाभांश शेतकऱ्यांना दिवाळीला मिळू शकला. मार्च २०२६ अखेरीस १२ लाख कर्जवाटप, २० लाख भागभांडवल, ४ लाख ठेवी असा ताळेबंद तयार झाला. व्यवहार वाढू लागल्याने या बचत गटाची ‘राजर्षी शाहू महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था’ स्थापन केली आहे.
प्रकाश हुंबरे अध्यक्ष, वैभव गायकवाड उपाध्यक्ष तर संभाजी गायकवाड सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

05596

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT