पुणे

कोल्हापूरः शेतकऱ्यांना दूध दरवाढ द्या गोकुळ संत्ताधाऱ्यांना समविचारी आघाडीची निवेदने

CD

शेतकऱ्यांना दूध दरवाढ द्या

गोकुळ संत्ताधाऱ्यांना समविचारी आघाडीची निवेदने

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : शेतकऱ्यांना दूध दर वाढ द्या, या मागणीसह प्रशासक कालावधीतील प्रोसिडिंगच्या प्रमाणित प्रतींची मागणी समविचारी आघाडीच्या संचालकांनी लेखी निवेदनाद्वारे केली. गोकुळच्या नुतन संचालकांच्या पहिल्याच बैठकीत ही मागणी केली. एका मागणीचे निवेदन अध्यक्षांना, तर दुसरे कार्यकारी संचालकांना दिले.

समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात दूध खरेदी दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर आणि विश्‍वासावर दूध संघ आहे. शेतकरी हाच संघाचा खरा मालक आणि कणा आहे. सध्या जिल्ह्यासह राज्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे उत्पादकांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. सध्या बाजारात दूध विक्रीचे दर वाढत आहेत. दूध दरवाढ करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

दरम्यान, प्रशासकीय कालावधीत सुमारे २४ कोटींचा तोटा दूध संघाला झाला आहे. तसेच अन्य काही माहिती समविचारी आघाडीच्या संचालकांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय काळातील प्रोसिडिंगची मागणी केली आहे. त्याचे स्वतंत्र निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, संघावर शासन नियुक्त असलेल्या प्रशासकीय मंडळाच्या कालावधीत झालेल्या सर्व बैठका, त्यामध्ये केलेले ठराव, निर्णय, तसेच संबंधित बैठकींच्या प्रोसिडिंगची संपूर्ण माहिती लवकरात लवकर द्यावी, असेही म्हटले आहे. निवेदनावर शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, बाबासाहेब देवकर, किसन चौगले, विश्‍वजित जाधव, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे, शशिकांत खोत, राजू आवळे, बयाजी शेळके आदी १३ संचालकांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतून कोकणात थेट १ तासात पोहोचणार, नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू; तिकीट दर किती?

पुण्याच्या एअर हॉस्टेसची गोंदियाच्या जंगलात हत्या, सोबतच्या व्यक्तीचं सोनं अन् पैसे लुटले; काय घडलं?

Latest Marathi News Update : राज्यात दुष्काळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर दोन राज्यातील मेंढपाळांमध्ये मोठा तणाव

Uran Fire: उरणमध्ये अग्नितांडव, गोदामात प्रचंड स्फोट; हवेत धुराचे लोट, नागरिकांना श्वास घेण्यास त्रास

Success Story:"आजचा दिवस तुझा नाही उद्या नक्की पास होशील" वडिलांच्या शब्दांनी दिली प्रेरणा; 34 वेळा नापास, 35व्या प्रयत्नात बनले अधिकारी!

SCROLL FOR NEXT