farmer 
पुणे

 पाटबंधारे विभाग सुधारणार तरी कधी? 

राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजन आणि पाणी चोरीमुळे इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्याचे पाणी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पिके जळू लागली आहेत. 

नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रामध्ये या वर्षी मुबलक पाणीसाठा झाला होता. सध्या धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. नीरा डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामाचे आवर्तन 15 मार्चपासून सुरू झाले आहे. गेल्या 35 दिवसांपासून निमगाव केतकी उपविभागातील 59 व 57 क्रमांकाच्या वितरिका सुरू असून, शेतकऱ्यांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे आवर्तनास विलंब होत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील निमसाखर, निरवांगी, कळंब, वालचंदनगर, लासुर्णे, बेलवाडी, कुरवली सपकळवाडी परिसरातील हजारो एकरातील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. 

बेसुमार पाणीचोरी मुळावर 
निमगाव केतकी उपविभागामध्ये गेल्या 35 दिवसांपासून नीरा डाव्या कालव्याचे पाणी सुरू आहे. या परिसरातील नीरा डावा कालवा व वितरिकेमधून सायफनद्वारे बेसुमार पाणीचोरी होत आहे. तसेच, शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेततळी भरली असल्यामुळे आवर्तनास विलंब होत आहे. 

आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा 
इंदापूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील 46, 43, 42, 39, 36, 53 या क्रमांकाच्या वितरिकेवरील शेतकऱ्यांवर दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अन्याय होत आहे. या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळत वेळेवर मिळत नसल्याने पिके जळत असतात. या वर्षीही धरणामध्ये मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही. त्यामुळे पिके जळण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांना वेळेत पाणी न दिल्यास येत्या चार दिवसांमध्ये आंदोलन करण्याचा इशारा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ व शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गणेश फडतरे यांनी दिला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : जिंतूरजवळ अकोली पुलावर भीषण अपघात; गंगाखेडचे चार तरुण जागीच ठार

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT