National Livestock Campaign esakal
पुणे

National Livestock Campaign : राष्ट्रीय पशुधन अभियानामुळे शेतकरी बनणार उद्योजक; ५० लाखांपर्यंत मिळणार अनुदान

सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतीपूरक व्यावसायासाठी प्रत्येकी किमान १० लाख आणि कमाल ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतीपूरक व्यावसायासाठी प्रत्येकी किमान १० लाख आणि कमाल ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, मूरघास निर्मिती आणि वैरण बियाणे उत्पादनासाठी अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेतकरी हे उद्योजक बनू शकणार आहेत.

केंद्र सरकारने बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत विविध केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करून सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान सुरु करण्यास एका पत्राद्वारे परवानगी दिली होती. या परवानगीनुसार सन २०२१ च्या अखेरीस राष्ट्रीय पशुधन अभियान सुरु करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय पशुधन अभियानात आता आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या नवीन अभियानाला सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान असे नाव देण्यात आले असल्याचे राज्याच्या पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले.

या सुधारित राष्ट्रीय अभियानात पशुधन व कुक्कुट वंश सुधारणा उपअभियान, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियान, नावीन्यपूर्ण संशोधन व विस्तार उपअभियान आदींचा समावेश केला आहे.

यापैकी पशुधन व कुक्कुट वंश सुधारणा उपअभियानांतर्गत शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, मूरघास निर्मिती आणि वैरण बियाणे उत्पादनासाठी प्रत्येकी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. यानुसार १०० शेळ्यांसाठी कमाल प१० लाख, २०० शेळ्यांसाठी २० लाख, ३०० शेळ्यांसाठी ३० लाख, ४०० शेळ्यांसाठी ४० लाख आणि ५०० शेळ्यांसाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

याशिवाय कुक्कुट पालनासाठी प्रत्येकी कमाल २५ लाख, वराह पालन योजनेंतर्गत ५० वराहसाठी प्रत्येकी कमाल १५ लाख आणि १०० वराहसाठी प्रत्येकी ३० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. शिवाय मूरघास व वैरण विकास प्रकल्पांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT