पुणे

सरसकट भरीव आर्थिक मदत द्या भारत कृषक समाजाची केंद्र व राज्य शासनाकडे मागणी

CD

शेतकऱ्यांना सरसकट
भरीव आर्थिक मदत द्या

भारत कृषक समाजाची केंद्र, राज्य शासनाकडे मागणी

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यानंतर झालेल्या पावसानेही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत न अडकवता सरसकट भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारत कृषक समाजाने (महाराष्ट्र) केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री व इतरांना निवेदने पाठविली. निवेदनात म्हटले, की खरीप हंगामाच्या सुरुवातीला पिकांची परिस्थिती चांगली होती. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने सोयाबीनसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर काही भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला असला, तरी ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना त्यातून फारसा दिलासा मिळालेला नाही. पावसानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे पिकांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
यंदा पीकविमा योजनेच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा काढलेला नाही. त्यामुळे शासनाने पंचनाम्याच्या प्रक्रियेत वेळ न घालवता नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच केंद्र शासनाचे पीक नुकसान पाहणी करणारे पथक तातडीने राज्यात बोलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाकडून आर्थिक मदत तसेच पीकविमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी भारत कृषक समाजाच्या वतीने चेअरमन डॉ. प्रकाश मानकर, डॉ. रमेश ठाकरे, प्रशांत चौधरी, वसंतराव महाजन, जगतराव पाटील आणि शेषराव पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Online Shopping: दिवाळीत बंपर डिस्काउंटच्या नावाखाली होतेय फसवणूक! 'हे' सायबर फ्रॉड माहीत असलेच पाहिजेत...

तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातील वक्तव्यावरून वाद; व्हायरल व्हिडीओबाबत अखेर गुरुदेव सेवा मंडळाने दिलं स्पष्टीकरण

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विचार करताय? गेल्या वर्षी घेतलेल्या सोन्याची किंमत वर्षभरात किती वाढली?

Anthropic IPO: ChatGPT ला टक्कर देणाऱ्या AI कंपनीचा मोठा धमाका! IPO मधून 100 अब्ज डॉलर उभारण्याची तयारी; काय आहे प्लॅन?

Ambabai Temple Kirnotsav: अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव अन् दिवाळी एकाच कालावधीत; गरुड मंडपाचीही होईल चाचणी

SCROLL FOR NEXT