mhalunge 
पुणे

शेतकरी मालामाल, कोथिंबिरीतून एका महिन्यातच मिळाले 70 हजार 

विवेक शिंदे

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील शेतकरी प्रशांत सैद पाटील यांना कोथिंबिरीच्या पिकातून 30 दिवसांत 70 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. 

आंबेगाव तालुक्‍यात चास, साकोरे, महाळुंगे पडवळ, नांदूर, कळंब, चांडोली बुद्रूक, एकलहरे, सुलतानपूर, वडगाव काशिंबेग, विठ्ठलवाडी, लौकी आदी घोड नदीकाठची गावे कोथिंबीर उत्पादनात अग्रेसर आहेत. या वर्षी कोरोना रोगामुळे लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे कोथिंबिरीला अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही. त्यातून अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबिरीकडे पाठ फिरविली होती. तसेच, लागवड केलेल्या कोथिंबिरीला पावसाने झोडपले. त्यामुळे कोथिंबिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या लॉकडाउन शिथिल केला आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे उत्पादन आणि मागणीत तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे नारायणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोथिंबिरीच्या प्रती जुडीला 50 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. 

आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील शेतकरी प्रशांत सैद पाटील यांनी वीस गुंठे क्षेत्रात कोथिंबिरीचे 25 किलो बियाणे शेतात टाकले. जमीन निचऱ्याची असल्याने पावसाने कोथिंबिरीला फटका बसला नाही. बियाणे, खते, औषधे व मजुरी असा सात ते आठ हजार रुपये खर्च झाला. दोन हजार 500 कोथिंबीर जुड्या निघाल्या. व्यापाऱ्याने शेताच्या बांधावर येऊन 70 हजार रुपयांना कोथिंबीर खरेदी केली. त्यामुळे त्यांना कोथिंबिरीच्या पिकातून 30 दिवसांत 70 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.  

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोथिंबिरीच्या जुडीला प्रतवारीनुसार 20 रुपयांपासून ते 50 रुपये बाजारभाव मिळत आहे.  कोरोनाच्या काळात कोथिंबिरीने कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. 
 - प्रशांत सैद, शेतकरी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT