कन्हेरी (ता. बारामती) - बिबट्याला पिटाळून लावणारे महादेव काळे व आनंदा केसकर (डावीकडील). 
पुणे

पुणे : शेतकऱ्यांनी परतवला बिबट्याचा हल्ला

सकाळवृत्तसेवा

वालचंदनगर - बारामती तालुक्‍यातील काटेवाडी- कन्हेरीजवळील ओढ्यालगत चरणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून मेंढीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महादेव काळे व आनंदा केसकर यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याचा पाठलाग करून हुसकावून लावले. 

कन्हेरीमध्ये दोन दिवसांपूर्वी बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला होता. आज (ता. २०) पाच वाजण्याच्या सुमारास महादेव मारुती काळे व आनंदा धुळा केसकर हे चारीलगत १०० मेंढ्या चारण्यासाठी गेले होते, त्या वेळी बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून मेंढीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काळे व केसकर यांनी दगडाने मारत बिबट्याचा पाठलाग केला व हुसकावून लावले. उसाच्या शेतामध्ये बिबट्या पळून गेला. हल्ल्यामध्ये मेंढी जखमी झाली आहे. 

दरम्यान, बिबट्याने हल्ला केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे अधिकारी रात्री गस्त घालत आहेत. शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी तातडीने शेतकऱ्यांची भेट घेऊन धीर दिला. या संदर्भात वनपरिमंडल अधिकारी त्र्यंबक जराड यांनी सांगितले, की बिबट्याचा काटेवाडी- कन्हेरी परिसरामध्ये वावर असून, ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. 

वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी कन्हेरीचे सरपंच सतीश काटे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दीड फुटाचा नाग बेडकाने जेरीस आणला; सर्पमित्रांनी दिलं जीवदान; छत्रपती संभाजी नगरमधील व्हिडीओ व्हायरल

Pune News : पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य; वाहतूक कोंडीत पुणेकरांचा दररोजचा खोळंबा

Pargaon News : भीमाशंकर कारखान्याची AI शेती योजना; ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी २५ हजार रुपयांचे तंत्रज्ञान अनुदान

अर्शदीप सिंगने निवडले भारताचे सर्वोत्तम ५ बॉलर, पण बुमराहकडे दुर्लक्ष! प्लेइंग इलेव्हनमध्ये गंभीरला दिली जागा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या दोन आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ, कारण काय?

SCROLL FOR NEXT