पुणे

शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग ; वाहतूक विस्कळीत

CD

शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळित
--
कर्जमाफी, पीकविमा व खतटंचाईच्या प्रश्नांवर हजारो शेतकरी आक्रमक
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
अंबाजोगाई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना घोषित केल्याप्रमाणे पीकविमा भरपाई मिळावी आणि रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत करावा, या प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २३) बर्दापूर फाट्यावर अंबाजोगाई-लातूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली.

बीड जिल्ह्यात गत खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे प्रतिहेक्टर १७,५०० रुपयांची विमा भरपाई द्यावी, तसेच खतांच्या वाढीव किमती कमी करून पुरवठा नियमित करावा, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

शेतकरी नेते अविनाश मोरे, ॲड. अजय बुरांडे, विलास बापू मोरे, सुरेश घोडके, धनाजी मदने, गोविंद मोरे, भागवतराव निकम, श्रीहरी होळकर, संजय गिराम, निलेश धुमाळ, तानाजी धुमाळ, विलास धुमाळ, उसामराव जांभळे, गोविंद चव्हाण, अमोल चव्हाण, नितीन शिंदे, वसंत शिंदे, विलास देशमुख, सादेक हुसेन, विभीषण औताडे, बबन भगत, मंचकराव जाधव, राजेभाऊ चव्हाण, नाना यादव, हनुमंत धुमाळ, वैभव काळम आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी भर उन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.

आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी बैलगाडी रस्त्यावर आडवी लावून निषेध व्यक्त केला. मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाल्याने परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
--

फोटो ओळ

अंबाजोगाई : बर्दापूर फाट्यावर आयोजित रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेले शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shops Rules: सोसायटीच्या संमतीशिवाय दारू विक्रीचं दुकान उघडता येणार नाही; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा आदेश काय?

५,२२० एसटी गाड्यांंसह ४२ रेल्वे फेऱ्यांचे नियोजन, गौरी-गणपतीसाठी प्रशासनाचा निर्णय; विशेष सवलतींचीही घोषणा

IND vs SL Test: आता न्याय मिळणार... साई सुदर्शनच्या माघारीमुळे 'त्या' फलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री होणार? त्याच्या पोस्टने उडवलेली खळबळ

IND vs SL Test : आधी जसप्रीत बुमराह, आता...! भारताच्या तगड्या फलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार; मागील दोन सामन्यांत ठोकलेय शतकं...

सासूबाईंमुळेच मी माझ्या मुलीला डे केअरमध्ये ठेवत नाही... मृणाल दुसानिसने स्पष्टच सांगितलं; म्हणते- त्या नुरवीला

SCROLL FOR NEXT