पुणे

विमा कंपनी कार्यालयांत शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळेना

CD

विमा कंपनीच्या कार्यालयांत शेतकऱ्यांना प्रतिसादच नाही
--
केळी पीकविमा तक्रारी प्रलंबित; जिल्ह्यातील बहुतांश कार्यालये कर्मचारीविना
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेसाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भारतीय कृषक विमा कंपनी (एआयसी) विरोधात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. पीकविम्याशी संबंधित अनेक तक्रारी प्रलंबित असून, त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कार्यालयात कर्मचारी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक माहितीही मिळत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे २०२१-२२ आणि २०२२-२३ या हंगामांतील अनेक विमा दावे अद्याप प्रलंबित आहेत. २०२२-२३ मध्ये वादळ व वेगवान वाऱ्यामुळे नुकसान झाल्यानंतर पंचनामे होऊनही अनेक शेतकऱ्यांना विमा परतावा मिळालेला नाही. काहींचे प्रस्ताव विनाकारण रद्द करण्यात आले, तर काहींना कमी क्षेत्र मंजूर करून अपुरा परतावा देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.

यंदाही अनेक केळी उत्पादकांचा विमा योजनेतील सहभाग संपुष्टात आणल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. लागवड, जिओ-टॅगिंग, पंचनामे आदी सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक प्रस्तावांवर चुकीच्या पद्धतीने कार्यवाही झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

केळी पिकासाठी विमा संरक्षणाचा कालावधी ३१ जुलै २०२६ रोजी संपणार आहे. नियमानुसार संरक्षण कालावधी संपल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना ४५ दिवसांत विमा परतावा देणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यापूर्वी प्रलंबित तक्रारींचा निपटारा करणे आवश्यक असल्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी शेतकरी कंपनीच्या कार्यालयांमध्ये जातात. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत कंपनीची कार्यालये असली, तरी बहुतांश ठिकाणी कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून येते. जळगाव, रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, पारोळा आणि बोदवड येथील कार्यालये अनेकदा ओस पडलेली असतात. संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधण्याचाही प्रयत्न निष्फळ ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा |

अजय देवगनला भेटलो नाही, पण... 'दृश्यम ३' पाहून पहिल्या भागातच मेलेला सॅम म्हणतो- मी सिनेमात जिवंत असतो तर...

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

SCROLL FOR NEXT