पुणे

खनौरी सीमेवर शेतकऱ्यांना अडविले

CD

खनौरी सीमेवर
शेतकऱ्यांना अडविले

पंतप्रधान मोदी, हरियाना सरकारकडे दिल्लीकडे जाण्याची परवानगी देण्याची मागणी

जिंद (हरियाना) ः अमेरिका-भारत व्यापार कराराला विरोध करण्यासाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पुढे जाण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन भारतीय किसान युनियन एकता सिधुपूरचे प्रमुख जगजितसिंग डल्लेवाल यांनी रविवारी (ता. १६) रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरियाना सरकारला केले.
मर्यादित संख्येने शेतकरी पायी आणि शांततेच्या मार्गाने दिल्लीकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा दिल्लीकडे जाणारा मोर्चा रोखण्यासाठी हरियाना पोलिसांनी खनौरी नाक्यावर मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केले आहे. त्यामुळे दिल्लीकडे निघालेले शेतकरी खनौरी सीमेवर अडकून पडले आहेत.
डल्लेवाल म्हणाले, ‘‘शेतकरी पायी निघाले होते; मात्र त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले आहे. हरियाना सरकारशी आमचा कोणताही संघर्ष नाही. हरियाना सरकार आणि भारताचे पंतप्रधान यांना माझी विनंती आहे की, आम्हाला पुढे जाण्याची परवानगी द्यावी.’’

प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) कायदेशीर हमी, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी यांचा समावेश असल्याचे जगजितसिंग डल्लेवाल यांनी सांगितले. भारत-अमेरिका व्यापार करार हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून, शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी हेदेखील प्रमुख मागण्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘‘सरकारने या मागण्यांवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तसेच पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेऊन पुढील मार्ग मोकळा करावा,’’ असे डल्लेवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

Maharashtra Live News : गोवा एक्स्प्रेसमधून ५० विद्यार्थी ताब्यात

थकलेला चेहरा, डोक्यावर टक्कल, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या हिरोची ही अवस्था, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT