पुणे

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट दोन लाखांची कर्जमाफी मिळावी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेत ठराव,, ओमकार ग्रुपच्या कर्जाचा विषय गाजला

CD

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट
दोन लाखांची कर्जमाफी मिळावी

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेत ठराव; ओंकार ग्रुपच्या कर्जाचा विषय गाजला

सकाळ वृत्तसेवा
उ. सोलापूर, ता. २२ : जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज फेडणे शक्य नसल्याने शासनाने सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी द्यावी, असा ठराव सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रारंभी आमदार अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांच्या सरसकट दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा ठराव मांडला. भारत शिंदे यांनी त्याला अनुमोदन दिले. यावेळी माजी आमदार धनाजी साठे, दादासाहेब साठे व सभासद उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी विषयपत्रिकेचे वाचन करून बँकेच्या प्रगतीचा आढावा सभेसमोर सादर केला.

‘ओंकार’ला नियमबाह्य कोट्यवधी रुपयांची कर्जे?
शेतकऱ्यांच्या संस्थांना कर्जासाठी अडचणी येत असताना जिल्ह्याबाहेरील कारखान्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज का दिले जाते, असा सवाल सभासदांनी उपस्थित केला. आमदार पाटील यांनीही यावर प्रश्न उपस्थित करताना, शेतकऱ्यांची बँक असताना एकाच ग्रुपला कोट्यवधींची कर्जे कशी दिली जातात आणि शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित का ठेवले जाते, असा सवाल केला. ओंकार ग्रुपच्या कारखान्यांना दिलेल्या कर्जाबाबतही त्यांनी आक्षेप नोंदविला. संबंधित कारखान्यांकडे मोलॅसिस शिल्लक नसताना त्यांना कर्ज कसे देण्यात आले, त्याची माहिती घेतली का आणि त्यांची कर्जे बेबाक कशी झाली, असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. यावर प्रशासक भोळे यांनी, असा प्रकार आढळल्यास ती बँकेची फसवणूक मानून संबंधित कारखान्यांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.

चौकट...
ठेवी वाढविल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव
प्रशासकांच्या कार्यकाळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवी १५०० कोटी रुपयांवरून ५००० कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढल्याबद्दल सभासदांनी प्रशासक कुंदन भोळे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. टाळ्यांच्या गजरात ठरावाचे स्वागत करण्यात आले.

चौकट...
जिल्हा बँकेला १४ कोटींचा निव्वळ नफा
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नफ्यात वाढ नोंदविली आहे. बँकेचा निव्वळ नफा १४ कोटी ३ लाख ३४ हजार रुपयांवर पोहोचला आहे.

बैठकीतील घडामोडी
- कर्जाच्या मुद्द्यावरून प्रशासक कुंदन भोळे व सभासदांमध्ये वादावादी; घटनास्थळी पोलिसांना पाचारण
- आमदार अभिजित पाटील यांनी ‘बँक शेतकऱ्यांची, पोलिसांची गरज काय?’ असे सांगत वाद थांबवला
- सभेच्या शेवटी कुंदन भोळे यांनी व्यक्त केली दिलगिरी
- प्रशासकांच्या कालावधीत पहिल्यांदाच चार तास चालली सभा
- पत्रकारांना सर्वसाधारण सभेत वार्तांकन करण्यास मज्जाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT