पुणे

अमरावतीत ‘क्रांतिकारी’ची जंबो बैठक; विदर्भात संघटन विस्ताराचा तुपकरांचा निर्धार

CD

दुष्काळ, पीकविमा, कर्जमाफी
प्रश्‍नी आंदोलनाची तयारी ः तुपकर

बुलडाणा : राज्यात दुष्काळी स्थिती, नुकसानभरपाई, पीकविमा, पूर्णवेळ वीजपुरवठा, जळालेले ट्रान्सफॉर्मर, सरसकट कर्जमाफी, नियमित कर्जदारांना दोन लाख रुपयांचे अनुदान आणि शेतकऱ्यांच्या ‘सिबिल’चा प्रश्नावर क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलनाची तयारी करीत आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली.
विदर्भात संघटना मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अमरावती येथे विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची जंबो बैठक नुकतीच घेतली. प्रत्येक गावात संघटनेची ताकद उभी करून शेतकरी प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन तुपकर त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

‘पायाला भिंगरी लावा’
गावागावात बैठका घेऊन तरुणांना चळवळीशी जोडावे, शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्या जाणून घ्याव्यात आणि संघटना मजबूत करावी, असे तुपकर यांनी सांगितले. ‘‘पायाला भिंगरी लावून विदर्भ पिंजून काढायचा,’’ असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीला वाशीम, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, अकोला, हिंगोली, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर व अमरावतीसह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका व गावपातळीवर संघटन विस्ताराचे लक्ष्य देण्यात आले.

अमित आढाऊंसह अनेकांचा प्रवेश
अमरावतीचे शेतकरी नेते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आढाऊ यांनी सहकाऱ्यांसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. आढाऊ यांच्यावर विदर्भ संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. नागपूरच्या ॲड. सृष्टीताई दौड यांची युवती आघाडीच्या राज्य कार्याध्यक्षपदी, तर मनीष नांदे यांची वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT