UPB26B04179
उपळाई बुद्रूक (ता.माढा) ः येथे शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोध दर्शविताना शेतकरी व त्यांच्याशी चर्चा करताना प्रशासनाचे अधिकारी.
जमीन देण्यास शेतकऱ्यांचा लेखी नकार; दिवसभर अधिकाऱ्यांचे मनधरणीचे प्रयत्न निष्फळ
उपळाई बुद्रूक, ता. २ : शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. महामार्गासाठी जमीन देण्यास तयार नसल्याचे लेखी निवेदन शेतकऱ्यांनी दिल्याने मंगळवारी (ता. २) मोजणीची प्रक्रिया होऊ शकली नाही. शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर सायंकाळी चारच्या सुमारास अधिकारी व पोलिसांना मोजणी न करताच माघारी फिरावे लागले.
शक्तिपीठ महामार्गाच्या अनुषंगाने जमीन मोजणी करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास उपळाई बुद्रूक येथील काटे वस्ती परिसरात दाखल झाले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोजणीसाठी संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार आगाऊ नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन मोजणीची कार्यवाही सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी एकत्र येत या प्रक्रियेला विरोध दर्शविला.
शक्तिपीठ महामार्गासाठी आपल्या जमिनी देण्यास कोणत्याही परिस्थितीत तयार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. तसेच याबाबतचे लेखी पत्रही अधिकाऱ्यांना दिले. तहसीलदार संजय भोसले यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुपारी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड यांनीही शेतकऱ्यांशी चर्चा करून मोजणीस सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र, शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरले.
अखेर दिवसभराच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी चारच्या सुमारास अधिकारी व पोलिस बंदोबस्तासह माघारी परतले.
या वेळी माढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.