महाळुंगे पडवळ, ता. ४ : चास (ता. आंबेगाव) येथे महावितरण कंपनीने थ्रीफेज शेती पंप वेळापत्रकात बदल करून चार दिवस रात्री वीज दिली आहे. तसेच उर्वरित तीन दिवसही विजेच्या लपंडावामुळे शेतकरी हैराण आहेत. त्यातच बिबट्याचीही भीती आहे. यातून कांदा लागवड कशी पूर्ण करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे आठवड्यातील सातही दिवस सुरळीत दिवसा वीजपुरवठा करा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
चास, कडेवाडी, ठाकरवाडी आदी परिसरात सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुरू आहे. तसेच महावितरण कंपनीने चार दिवस रात्री तर तीन दिवस सकाळी वीज दिली आहे. तसेच दिवसा दिलेली वीजही वेळेवर आणि पुरेशी मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी आणलेल्या मजुरांची मजुरी अंगावर भरून द्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च वाढत आहे. सामाईक विहीर असल्याने शेतकरी बाऱ्या धरतात. विद्युत पुरवठा आल्यानंतर शेतात पाणी येत नाही तोच पुन्हा विद्युत पुरवठा खंडित होतो. विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके सुकू लागली आहेत.
“चास, कडेवाडी, ठाकरवाडी परिसर बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. महावितरण कंपनीने थ्री फेज शेती पंपासाठी रात्री १:१० ते सकाळी ७:१० या वेळेत वीज दिली आहे. त्यामुळे शेतकरी रात्री अपरात्री शेताकडे जाऊन विद्युत मोटारी सुरू करत आहेत. त्यामुळे बिबट्यांचा हल्ला होण्याचा धोका निर्माण झाला आहे,’’ अशी भीती सरपंच अर्चना बारवे व उपसरपंच श्रीकांत शेगर यांनी व्यक्त केली आहे.
विजेचा दबाव वाढल्याने वडगाव काशिंबेग येथील वीज उपकेंद्रात ओव्हरलोड होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. उपकेंद्रात युद्धपातळीवर काम सुरू आहे.
- दिगंबर लोहकरे, नारोडीचे शाखा अभियंता, महावितरण कंपनी
03970
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.