खुटबाव, १२ : शेतकऱ्यांना नियमानुसार सलग आठ तास थ्री-फेज वीजपुरवठा मिळावा तसेच नागरी भागात सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत करण्यात येणारे भारनियमन तातडीने बंद करावे, या मागणीसाठी पारगाव (ता. दौंड) येथील शेतकरी व ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. ११) दापोडी-केडगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात निवेदन दिले.
यावेळी सरपंच सुभाष बोत्रे, बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, माजी उपसभापती सयाजी ताकवणे, बाळकृष्ण तांबे, सतीश तावरे, सुरेश शेळके, सुरेश ताकवणे, शिवाजी ताकवणे, डी.जे. ताकवणे, विजय जेधे, सखाराम जेधे, नितीन ताकवणे, दादासाहेब निंबाळकर, नारायण जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पोपटराव ताकवणे म्हणाले की, केडगाव उपविभाग आणि पारगाव शाखेच्या कार्यक्षेत्रात गेल्या महिनाभरापासून वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना २४ तासांच्या कालावधीत आठ तास थ्री-फेज वीजपुरवठा मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात रात्रीच्या वेळेत सुमारे सहा तासच वीज दिली जाते. त्यातही वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चालू वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. विद्युतपंपातून पाण्याचा उपसा करण्यासाठी नियमित वीज आवश्यक आहे.
दरम्यान, शिंदेवाडी फिडर सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत बंद ठेवण्यात येत असल्याने नागरी भागातील नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.