पुणे

मागण्याबाबत प्रशासनाचे अखेर लेखी आश्वासन!

CD

पान ६ - फोटो B17795
------------------
मागण्यांबाबत प्रशासनाचे
अखेर लेखी आश्वासन

- गायरानधारक, शेतमजुरांचे पिठलं भाकरी आंदोलन अखेर मागे

ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : ‘दुष्काळी मदत शेतमजूर व गायरान धारकांनाही द्या’ या प्रमुख मागणीसाठी सुरू जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून (ता.४) असलेले ‘पिठलं भाकरी आंदोलन’ प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर अखेर गुरूवारी (ता.५) सायंकाळी ४ वाजता मागे घेण्यात आल्याची माहिती लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्रा. राम बाहेती यांनी दिली.

माहितीनुसार, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतमजदुर युनियनशी संलग्न असलेल्या लाल बावटा शेतमजूर युनियनच्यावतीने जिल्हाभरातील गायरान धारक, शेतमजूर,रोहयो मजूर आदी ग्रामीण कष्टकऱ्यांचे हे आंदोलन सुरू करण्यात आले. दुष्काळग्रस्त तालुक्यातील सर्व गावातील गायरानधारक, शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, ग्रामीण कष्टकरी, शेतमजुरांसाठी रोजगार हमीची व दुष्काळी कामे काढावीत, गायरान जमिनीच्या पट्ट्याची मालकी द्यावी, घरकुलाची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत, मायक्रो फायनान्सचा विळखा थांबवावा,सक्तीची कर्ज वसुली करणाऱ्यांना अटक करा आदी मागण्या या आंदोलनाद्वारे केल्या आहेत.

बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून पिठलं भाकरी करत दुपारचे जेवण करण्यात आले. रात्रीही चुली पेटवून तेथेच जेवण करून मुक्काम करण्यांत आला. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी विनय गौडा यांना लाल बावटा शेतमजूर युनियनचे २५ जणांचे शिष्टमंडळ भेटले. त्यांनी सर्व मागण्यांबाबत ऐकून घेतले. मंजूर घरकुलांना गाय रानात जागा देण्यात येईल हे त्यांनी मान्य केले. तसेच १९९० पूर्वीची अतिक्रमणाची प्रकरणे नक्की निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यासंदर्भात लेखी पत्र मिळेपर्यंत तसेच जोपर्यंत दुष्काळी मदत मिळत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय घेण्यात आल्याने गुरुवारीही आंदोलन सुरू होते.

दरम्यान, गुरुवारी दुपारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर स्थानिक मागणी विषयी व शासन स्तरावरील मागण्यांविषयी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती कॉम्रेड राम बाहेती यांनी दिली. सोयगाव, गंगापूर, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या तालुक्यातील सुमारे ३०० ग्रामीण कष्टकरी यात सहभागी झाले होते.

..... फोटो B17795 .....
छत्रपती संभाजीनगर : आंदोलनात सहभागी शेतमजूर व लालबावटा शेतमजूर युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : नागपुरात भाजपची 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' रॅली

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT