पुणे

सातारा शक्तिपीठ’च्या मोजणीस शेतकऱ्यांचा विरोध

CD

‘शक्तिपीठ’च्या मोजणीस
शेतकऱ्यांचा विरोध
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
मायणी, जि. सातारा : शक्तिपीठ महामार्गाच्या अधिग्रहण करावयाच्या जागेची मोजणी करण्यासाठी व शेतकऱ्यांसाठी समन्वय साधण्यासाठी शासकीय अधिकारी मायणी शिंदेवाडा येथे आले होते. मात्र, अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने विनामोजणी करता अधिकाऱ्यांना परतावे लागले.
मायणीतील पूर्व भागातील शिंदेवाडा येथून जाणाऱ्या शक्तिपीठ मार्गाची मोजणी करण्यासाठी व शेतकऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी शासकीय अधिकारी सोमवारी मायणीत दाखल झाले. त्यांचा कानोसा लागताच भागातील शेतकरी एकवटले. त्यांनी ‘आम्हाला रस्ता नको, मोजणी करू नका’, असे सांगत मोजणीस प्रतिबंध केला. त्यावेळी खटावच्या तहसीलदार बाई माने, भूमापन उपअधीक्षक सुनील राऊत, मोनोज कंपनीचे प्रतिनिधी प्रमोद सावंत, सरपंच प्रतिनिधी रणजित माने, तलाठी, पोलिस पाटील प्रशांत कोळी, सुनील भिसे, शांताराम देशमुख, मनोज भिसे, रामभाऊ शिंदे, अतुल देशमुखे, सचिन शिंदे, किसन शिंदे, सुनीता शिंदे, दत्तात्रय शिंदे, सुखदेव शिंदे, रमेश शिंदे, हनुमंत भिसे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

कोट ---
माण तालुक्यातील १४ गावे, खटाव तालुक्यामधील पाचपैकी चार गावांनी सहकार्याची भूमिका घेतली असून, आपणही सहकार्य द्यावे. आपल्या अडचणी निवेदनाद्वारे आमच्याकडे दिल्यास त्या अडचणी आम्ही शासनापुढे मांडू, मात्र या कामास विरोध करू नये.
- बाई माने, तहसीलदार
----
कोट
२७ ऑगस्ट रोजी मायणीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील येणार असून, त्यांच्यापुढे आम्ही आमच्या सर्व व्यथा मांडू. तोपर्यंत रस्त्याची मोजणीचे काम थांबवावे, अन्यथा शेतकरी आंदोलन करतील.
- रणजित माने, सरपंच प्रतिनिधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT