पुणे

''गुंजवणी''चे काम वाल्ह्यात पुन्हा रोखले

CD

वाल्हे, ता. २८ : गुंजवणी प्रकल्पाच्या बंद पाइपलाइनचे काम शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता आणि जुन्या सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष करून सुरू असल्याचा आरोप करत, वाल्हे (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २८) हे काम आक्रमक पवित्रा घेत पुन्हा बंद पाडले.
प्रकल्पांतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. मात्र, १९९३ च्या मूळ सर्वेक्षणानुसार आखलेल्या मार्गाचा विचार न करता आणि संबंधित शेतकऱ्यांची संमती न घेता कंपनी मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या बैठकीत या कामाला एकमुखाने विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी थेट प्रकल्प स्थळी धाव घेऊन काम थांबवले. यावेळी ॲड. फत्तेसिंग पवार, बाळासाहेब राऊत, विक्रमसिंह भोसले, समदास राऊत, पोपट नवले, रणसिंग पवार, मदन भुजबळ, माणिक पवार, उमेश पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
बाळासाहेब राऊत म्हणाले, "गेल्या पाच वर्षांपासून आम्ही मागणी करत असूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अनेकदा पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची दमदाटी केली जाते. काही ठिकाणी इतरांच्या सह्या घेऊन बेकायदा काम सुरू आहे." दरम्यान, कंपनीच्या या भूमिकेविरोधात गुरुवारी (ता. ३०) ग्रामस्थांची बैठक घेऊन ''गाव बंद'' ठेवण्याचा इशारा ॲड. फत्तेसिंग पवार यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतेही काम सुरू करू नये
पाइपलाइन टाकताना पिकांचे नुकसान होऊ नये
नुकसान झाल्यास तत्काळ भरपाई द्यावी
१९९३ च्या सर्वेक्षणानुसारच पाइपलाइनचे नियोजन करावे
चार फूट व्यासाची पाइपलाइन टाकावी
कामाच्या ठिकाणी दिशादर्शक माहिती फलक लावावेत

WHL26B07025

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Yellow Alert Maharashtra : विदर्भाला उष्णतेपासून दिलासा! उद्यापासून पूर्वमोसमी पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना Yellow Alert, मराठवाडा-पुण्यात काय स्थिती?

शैलजा ते शैलेश... राजश्री देशपांडेचा थक्क करणारा प्रवास! 'बाप्या' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

China Flood Latest News : चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 2 तासांत 200 मिमी पाऊस, Qinzhou शहरात ढगफुटीसदृश परिस्थिती

Jalgaon Temperature : तापमानाचा पारा ४४ पार; उष्माघाताचा धोका वाढला!

SCROLL FOR NEXT