पुणे

ऊसाला ५ हजार रुपये पहिली उचल द्या; विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे गाळप बंद पाडले

CD

UPR26B08905
पंढरपूर : श्री विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या गव्हाणीत आंदोलन करताना शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे गाळप पाडले बंद
उसाला पाच हजारांची पहिली उचल देण्याची मागणी; गव्हाणीत ठिय्या आंदोलन

पंढरपूर, ता. २९ : उसाला पहिली उचल पाच हजार रुपये जाहीर करण्याच्या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समितीने गुरुवारी (ता. २९) आक्रमक पवित्रा घेतला. रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी करकंब येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे गाळप बंद पाडले. दुपारपासून गाळप बंद झाल्याने ऊसतोडणी आणि वाहतूक ठप्प झाली आहे.
यंदाच्या हंगामातील उसाला पाच हजार रुपये पहिली उचल द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कारखान्यांनी ऊसदर जाहीर न करताच गाळप सुरू केल्याने शेतकरी संघटनांमध्ये संताप आहे. यापूर्वीही ऊसदरासाठी आंदोलने करण्यात आली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून कारखाने सुरू करण्यात आल्याने संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत.
गुरुवारी दुपारपासून कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. व्यवस्थापनाने पाच हजार रुपये पहिली उचल जाहीर करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आणि गाळप सुरू होऊ देणार नाही, असा इशारा ऊस दर संघर्ष समितीने दिला आहे. या आंदोलनामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. आंदोलनात दीपक भोसले, समाधान फाटे, सचिन पाटील, विक्रांत जगदाळे, निवास नागणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ABHISHEK SHARMA RECORD: अभिषेक शर्माच्या निशाण्यावर राहुल-हार्दिकचा विक्रम! चौथ्या T20 सामन्यात इतिहास घडवण्याची संधी

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

SCROLL FOR NEXT