पुणे

मावळात पिके राखण्यासाठी ‘शेतकरी यंत्रणा’ सज्ज

सकाळवृत्तसेवा

टाकवे बुद्रुक - सध्या नाणे मावळातील शिवारांत लागवड केलेल्या विविध पिकांचे वन्यप्राणी आणि पक्ष्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी आपापल्या शेतावर मचाण बनवल्या आहेत.

ज्वारी, बाजरी, मका व भुईमूग अशा पिकांवर पक्ष्यांचे थवे आक्रमण करतात. ते रसदार कोवळे दाणे फस्त करतात. खरीप हंगाम संपला की नाणे मावळात वाटाणा, हरभरा, मसूर, मका, ज्वारी, बाजरी व भुईमूग या रब्बी पिकांची लागवड केली जाते. या पिकांची वाढ झाल्यानंतर डोंगरभागाशेजारी असलेल्या शिवारात रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा वावर वाढतो व दिवसा पिकांच्या कणसांवर पक्ष्यांचे थवे रसदार कोवळे दाणे टिपायला येऊ लागतात. या वन्यप्राण्यांकडून रब्बी पिकांची नासधूस, तर हाती मिळणारे धान्य पक्ष्यांकडून फस्त व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपापल्या पिकांची राखण करण्यासाठी शेतकऱ्यांनाच शेतावर थांबावे लागते व शेतकरी एक आसरा म्हणून या मचाणींची बांधणी लाकडांपासून व पेंढ्यापासून करतात. 

रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांपासून व सापांपासून आपापले संरक्षण व्हावे म्हणून त्या उंचही बनवल्या आहेत. दिवसा उन्हाच्या तडाख्यातूनही सुटका या मचाणींपासून होत आहे. दिवसा व रात्रीच्या वेळी शेतकरी शिवारात बनवलेल्या या मचाणींमध्ये राहून पत्रांचे डबे वाजवून वन्यप्राण्यांना व पक्ष्यांना पळवून लावत आहेत व आपल्या पिकांना वन्यप्राणी व पक्ष्यांपासून दूर ठेवत आहे. त्यामुळे हाती चांगल्या प्रकारे धान्य व कडधान्य मिळेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT