पुणे

रिंग रोडसाठी योग्य मोबदला द्या

CD

औंध, ता. २५ : सूसगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेला बाधित शेतकऱ्यांचा विरोध नसून, योग्य आणि न्याय्य मोबदला मिळावा, अशी एकमुखी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली. ‘आम्ही विकासाच्या विरोधात नाही, मात्र जमिनीचा मोबदला बाजारभावाप्रमाणे मिळावा,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे.

या वेळी गोपीनाथ चांदेरे, अंकुश भोते, प्रमोद चांदेरे, सुनील चांदेरे, शरद गोडांबे, पप्पू फणसे, नाना चांदेरे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. रिंग रोडच्या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, आमच्याकडे असलेली हीच एकमेव शेती आहे. सध्याच्या काळात दुसरीकडे शेती घेणे परवडणारे नाही. त्यामुळे प्रशासनाने आमच्या जमिनीला महापालिकेच्या हद्दीप्रमाणे किंवा सध्याच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला देणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर काही मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये जमिनीचा मोबदला महापालिकेच्या हद्दीप्रमाणे देण्यात यावा, तसेच रिंग रोडपासून एक किलोमीटरच्या परिसरात झालेल्या जमीन व्यवहाराच्या दरानुसार चार ते पाच पट मोबदला मिळावा, रिंग रोडमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे दोन तुकडे होणार आहेत. यामुळे शेतात ये-जा करण्यासाठी, जनावरे आणि शेती अवजारे नेण्यासाठी ठिकठिकाणी भुयारी रस्ते करण्यात यावेत, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांचा सकारात्मक विचार न झाल्यास शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची शक्यता आहे. प्रस्तावित रिंग रोडच्या कामात शेतकऱ्यांचे हित जोपासावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT