shirur ashok pavar 
पुणे

शिरूरच्या शेतकऱ्यांना मिळणार एवढी नुकसान भरपाई

प्रताप भोयटे

न्हावरे (पुणे) : शिरूर तालुक्यात गेल्यावर्षी (सन २०१९) आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या तालुक्यातील १५ हजार २८ शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पाच कोटी सत्तर लाख त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकऱ्यांना मंजूर झाले असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.

शिरूर तालुक्यात गतवर्षी ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांचे फळबाग, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामधील बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मदतीचे धनादेश न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना स्थळावर प्रातिनिधिक स्वरुपात वाटप  आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

आमदार पवार यांनी सांगितले की, गतवर्षी आॅक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत शिरूर तालुक्यातील १०४ गावांतील ६ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान शासनाच्या माध्यमातून तालुक्यातील १५ हजार २८ नुकसानग्रस्त लाभधारक शेतकऱ्यांना ५ कोटी ७० लाख ७३ हजार ६४८ रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली असून, फळ झाडांसाठी प्रतिहेक्टरी अठरा हजार रुपये, तर इतर पिकांसाठी प्रतिहेक्टरी आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती विचारात घेता नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. 

या वेळी शिरुरचे प्रभारी तहसीलदार ज्ञानदेव यादव, तालुका कृषी अधिकारी सतिश केळगंद्रे, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर, श्रीगोंदा साखर कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह मोकाशी, घोडगंगा कारखान्याचे संचालक बिरा शेंडगे, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब घाडगे, मंडल अधिकारी मनीषा खैरे, कृषी मंडल अधिकारी कैलास सात्रस, डी. ई. हिरवे, कृषी सहायक सुनील नाईक, तलाठी एम. बी. बिराजदार, सरपंच कैलास कोल्हे, इनामगावचे माजी उपसरपंच तुकाराम मचाले, गोरख तांबे, तात्याबा शेंडगे, प्रगतशील शेतकरी शिवाजी घोलप, बाळासाहेब वाघचौरे या वेळी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Vijayadashami Speech : ‘विविधतेतील एकता’च विसरल्यामुळे आपण दुर्बल झालो; मोहन भागवतांनी नव्या पिढीला दिला 'हा' संदेश

मशरूम अन् भोपळ्याची ही रेसिपी खाल्लीये कधी? ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला व्हिडीओ, नेटकऱ्यांना आठवले सह्याद्री वाहिनीचे दिवस

Pune Municipal Corporation: नियमांना फाटा देत पदभरती; पुणे महापालिकेत कमी केलेल्या ४५ कर्मचाऱ्यांच्या फेरनियुक्तीचा घाट

साक्षीला आईस्क्रीम खाऊ घालायला गेला धोनी, पण पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही! VIDEO व्हायरल

Gokul Chairman 2026 : 'गोकुळ'चा नवा अध्यक्ष कोण? आमदार सतेज पाटलांनी दिलेला शब्द पाळत 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता!

SCROLL FOR NEXT