पुणे

शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी पाच शेतकऱ्यांची निवड

CD

शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी
पाच शेतकऱ्यांची निवड

अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला : शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी कृषी विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या सोडतीत जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातून योगेश राऊत (ता. बाळापूर), गणेश तायडे (ता. बाळापूर) आणि विनायक वारे (ता. मूर्तिजापूर) यांची निवड झाली.
महिला गटातून सुरेखा अनिल भगत (ता. बार्शीटाकळी), तर केंद्र-राज्य कृषी पुरस्कारप्राप्त गटातून गणेश जगन्नाथ काळे (रा. तामशी, ता. बाळापूर) यांची निवड करण्यात आली. युरोप, चीन दौऱ्यासाठी ही लाॅटरी काढण्यात आली.
शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन तसेच प्रगत शेती पद्धतींची माहिती मिळावी, या उद्देशाने अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात येते. या दौऱ्याच्या माध्यमातून विविध भागांतील शेतीतील प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी निवड झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी पात्र अर्जदारांमधून सोडत काढण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुषार जाधव, कृषी उपसंचालक हरिश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी विवेक बिऱ्हाडे यांच्यासह अर्जदार शेतकरी उपस्थित होते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना दौऱ्याबाबतची पुढील माहिती कृषी विभागामार्फत देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : ...'मग माझा राजीनामा का मागता?' पेपरफुटीवरुन 'एमपीएससी'चे अध्यक्ष विवेक भीमनवारांचे खुले पत्र

सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रेयस अय्यर; ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी पुन्हा मुंबईकर समोरासमोर, नेमकं काय घडतंय?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाचा OBC 'क्रिमी लेयर' आरक्षणावर मोठा निर्णय; केंद्राला अंतरिम दिलासा देण्यास नकार

मराठी कलाकारांना हिंदी मालिकांच्या सेटवर कसं वागवलं जातं? ‘वहिनीसाहेब’ फेम अभिनेत्रीने सांगितलं सेटवरचं वातावरण

‘बघ बघ अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय…’ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा डान्स पाहून नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT