डोक्यावर बर्फ अन्
जीभेवर साखर ठेवून बोला
आमदार पवारांकडून आढावा बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती
ॲग्रोवन वृत्तसेवा
लातूर :‘‘डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर ठेवून शेतकऱ्यांशी संवाद साधावा. सेवेतील निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही,’’ अशा शब्दात आमदार अभिमन्यू पवार यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले.
शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी सोमवारी (ता. २७) औसा येथे आयोजित बैठकीत आमदार पवार बोलत होते. शेतकऱ्यांचे कॉल न घेण्यासोबत त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असल्याची माहिती मिळाल्यानंतर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत
तातडीने कामकाजात सुधारणा करावी. महावितरण ही पूर्णतः सेवा क्षेत्रातील संस्था आहे. तुमचे काम हे लोकसेवेचे आहे. अत्यंत संयमाने, शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम करणे अपेक्षित आहे, असे आमदार पवार यांनी सांगितले.
तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणींचा सखोल आढावा घेताना त्यांनी स्पष्ट केले की, सर्व अडथळे तत्काळ दूर होतील असे नसले तरी, त्या समस्यांची तीव्रता किमान पातळीवर आणणे अत्यंत आवश्यक आहे. एका शाखा अभियंत्याकडे सुमारे १० ते १५ गावांचा भार असल्याने कामाचा प्रचंड ताण असल्याचे मान्य करतानाच शेतकऱ्यांचे फोन वेळेवर उचलणे, त्यांच्या तक्रारी काळजीपूर्वक ऐकणे आणि त्यावर तत्परतेने कार्यवाही करणे ही तुमची मूलभूत व अपरिहार्य जबाबदारी आहे, असेही पवार यांनी ठणकावून सांगितले.
औसा तालुक्यासाठी स्वतंत्र निधी मिळणार असल्याचे सांगून मी जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे आणि त्या विश्वासाला न्याय देणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे आता केवळ बैठका किंवा चर्चा पुरेशा नसून अंमलबजावणी आणि परिणाम दिसले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतीसाठी आठ तासांचा वीजपुरवठा अखंड, स्थिर आणि सुरळीत राहणे हे बंधनकारक असल्याचे सांगत त्यांनी वाकलेले पोल, जीर्ण तारा आणि खराब झालेली पायाभूत यंत्रणा तातडीने दुरुस्त करावेत, लाइनमनने अत्यंत जबाबदारीने, तत्परतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे, असेही पवार यांनी निर्देशित केले.
या वेळी माजी आमदार दिनकर माने, महवितरण मुख्य अभियंता अरविंद गुलबुले, कार्यकारी अभियंता प्रशांत दाने, पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, उपसभापती अमोल पाटील, जिल्हा परिषद सभापती कविता गोरे, सभापती अश्विनी बालाजी माने व शाखा अभियंता उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.