पुणे

बलकवडे व्याख्यान, हुतात्मा अभिवादन

CD

फाशीच्या वडाचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करा

पांडुरंग बलकवडे; सातारा पालिका व राष्ट्र संवर्धन संस्था यांच्या वतीने हुतात्म्यांना आदरांजली

सातारा, ता. ८ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकावला; परंतु इंग्रजांनी आपल्या कुटील कारस्थानाने छत्रपतींचे राज्य खालसा केले. लढवय्या बहुजन समाजाने स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करून सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. या लढ्यात १७ नरवीरांना हौतात्म्य प्राप्त झाले. हा सर्व इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करून नवीन पिढी सक्षम, सजग घडविण्याची आवश्यकता आहे. ही ऐतिहासिक घटना नवीन पिढीला प्रेरणादायी असून, भारत बलशाली राष्ट्र होण्यासाठी अशा शिक्षणाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.

सातारा पालिका व राष्ट्र संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १८५७ स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी येथील फाशीचा वड हुतात्मा स्मारक येथे आयोजिलेल्या अभिवादन कार्यक्रमात बलकवडे बोलत होते. १६९ वा अभिवादन कार्यक्रमास नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपाध्यक्ष ॲड डी. जी. बनकर, मुख्याधिकारी विनोद जळक यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. रेश्मा वाळिंबे यांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हटले. कार्यक्रमास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका घोरपडे, आरोग्य समितीचे सभापती धनंजय जांभळे, नगरसेविका भारती शिंदे, शारदा वाघमोडे, कमल गोसावी, नगरसेवक विश्वतेज बालुगडे, अक्षय जाधव, रविराज किर्दत, मुकुंदराव आफळे, अमित कुलकर्णी, महेश शिवदे, रविराज गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते. अशोक रेमझे यांनी स्वागत केले. जयंत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाशराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

PNE26W48154
सातारा : फाशीचा वड हुतात्मा स्मारक येथे मंगळवारी हुतात्म्यांना आदरांजली वाहिल्यानंतर उपस्थितांसमोर बोलताना पांडुरंग बलकवडे.
(प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT