Accident News Esakal
पुणे

Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 3 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

उर्से गावाजवळ भरधाव कारची ट्रकला धडक

सकाळ डिजिटल टीम

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून मोटार धडकून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेले तिघेही सातारा जिल्ह्यातील आहेत.

विजय विश्वनाथ खैर (वय ७४), राहुल बाळकृष्म कुलकर्णी (वय ४३ रा. दोघे सातारा), हेमंत राउत (वय ३५ रा. सातारा) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. या बाबत मिळालेली माहिती अशी ः कामानिमित्त मुंबईला गेलेले तिघे जण मुंबईहून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने साताऱ्याकडे येत होते.

उर्से टोल नाक्याजवळ एका वाहनाला डाव्या बाजूने वेगात ओव्हरटेक करीत असताना डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला उभी असलेला कंटेनर त्यांना दिसला नाही. ते थेट कंटेनरला मागून धडकले. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनरमध्ये अडकलेली मोटार बाहेर काढून मृतदेह तळेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यातील दोघे एका कंपनीच्या कामासाठी मुंबईला गेल्याचे समजते. अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT