राजगुरूनगर (ता. खेड) - वडिलांचे केशकर्तन करताना गायत्री. 
पुणे

#Lockdown2.0 : गायत्रीने केले वडिलांचे घरीच केशकर्तन

सकाळवृत्तसेवा

कडूस - लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना राजगुरूनगर येथील गायत्री शिंदे या इंग्रजी माध्यमातून नववीत शिकणाऱ्या मुलीने आपल्या कृतीतून शिकवण दिली आहे. केशकर्तनालये बंद असल्याने तिने आपल्या वडिलांचे स्वतःच्या हाताने घरच्याघरी केशकर्तन करून वडिलांना घराबाहेर जाण्यापासून रोखले. या कृतीतून ‘घरात रहा, सुरक्षित रहा,’ असा संदेश तिने दिला आहे.

लॉकडाऊनमुळे केशकर्तनालये बंद आहेत. या समस्येचा जसा नागरिकांना सामना करावा लागतोय तसाच गायत्रीच्या वडिलांना पण करावा लागला. परंतु तिने यावर स्वतः मार्ग काढीत वडिलांना घराबाहेर जाण्यापासून रोखले. कात्री व इलेक्‍ट्रॉनिक मशीनच्या मदतीने तिने वडिलांचे घरच्या घरी हेअर कटिंग केले. हेअर कटिंगचे शिक्षण घेतलेले नसतानाही गायत्रीने वडिलांच्या केशकर्तनासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT