वालचंदनगर, ता. २३ : लासुर्णे जवळील कर्दनवाडी (ता. इंदापूर) येथील ५१ वर्षीय संजय महादेव कदम आणि त्यांचा २४ वर्षीय मुलगा पार्थ संजय कदम या पिता-पुत्राने एकाच वर्षी एल.एल.बी. (कायद्याची पदवी) पूर्ण करून शिक्षणापुढे वयाचे बंधन नसते, हे सिद्ध केले आहे.
संजय कदम यांनी १९९२ मध्ये दहावी व त्यानंतर आयटीआय (फिटर) पूर्ण करून पुण्यात नोकरी केली. मात्र, मंदीमुळे २००० मध्ये त्यांनी गावी परतत शेती सुरू केली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी २००४ पासून त्यांनी लासुर्णे येथील ॲड. हेमंतराव नरुटे यांच्याकडे लिपिक म्हणून काम सुरू केले. या कामातूनच त्यांना कायद्याची आवड निर्माण झाली. २०१९ मध्ये त्यांनी वकील होण्याचा निर्धार केला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी एल.एल.बी.ला प्रवेश घेतला. २०२६ च्या अंतिम निकालात संजय कदम आणि त्यांचा मुलगा पार्थ या दोघांनीही एकत्र यश संपादन केले. या अनोख्या यशाबद्दल लासुर्णे ग्रामस्थांच्या वतीने पिता-पुत्राचा गौरव करण्यात आला.
लासुर्णेमधील ॲड. हेमंतराव नरुटे यांच्या ऑफिसमध्ये क्लार्कचे काम करीत असताना कायद्यातील ज्ञानाविषयी आवड निर्माण झाली होती. आपणही वकिल होऊ शकतो का? असा विचार मनामध्ये आल्यानंतर ॲड. हेमंतराव नरुटे यांनी एल.एल.बी.च्या परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे एल.एल.बीची परीक्षा उत्तीर्ण झालो.
- संजय कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.