drown 
पुणे

पोहायला शिकवायला आलेले वडील मुलींच्या डोळ्यादेखतच तलावात बुडाले... 

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : आपल्या दोन मुलींना पोहायला शिकविण्यासाठी तलावात उतरलेल्या वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना लांडेवाडी- चिंचोडी (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. रवींद्र महिपतराव आढळराव पाटील (वय 39), असे मृत्यु झालेल्या वडिलांचे नाव आहे.  

लांडेवाडी- चिंचोडी गावाच्या हद्दीत तलाव आहे. उजव्या कालव्याच्या पोटचारीचे पाणी तलावात आले आहे. त्यामुळे तलाव पाण्याने भरलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काही जण पोहण्यासाठी येतात. रवींद्र आढळराव पाटील हे आपल्या शुभ्रा (इयत्ता दुसरी, वय 8), रुचिका (इयत्ता सातवी, वय 14) या दोन मुलींना पोहायला शिकवण्यासाठी तलावाजवळ आले. मुली काठावरच उभ्या होत्या. रवींद्र हे तलावात उतरून पोहत होते. पण, ते पाण्याच्या बाहेरच आले नाही. त्यामुळे मुलींनी आरडाओरड केला. 

या मुलींच्या ओरडण्याचा आवाज एकूण परिसरात राहणारे पप्पू आढळराव पाटील, सचिन आढळराव पाटील व नंदी समाजाची दोन मुले (नावे माहीत नाही) मदतीसाठी धावून आली. रवींद्र आढळराव पाटील हे पाण्यात दिसत नव्हते. त्यामुळे त्यांचा पाण्यात शोध घेतला. त्यानंतर त्यांना तलावातून बाहेर काढून उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Kuno Cheetah: भारतात चित्त्यांचे 'अर्धशतक' पूर्ण! ज्वालाने दिला ५ पिल्लांना जन्म; कूनोमध्ये आता चित्त्यांची संख्या ५३ वर!

Maharashtra U23 Women Cricket: महिला २३ वर्षाखालील क्रिकेट; महाराष्ट्राने तमिळनाडूवर ८ विकेटने मात

SCROLL FOR NEXT