पुणे

नादुरुस्त 'पीएमपी'ने  प्रवाशांची गैरसोय 

सकाळ वृत्तसेवा

भाडेतत्त्वावरील बसच्या महापालिका बस स्थानकातून शहराच्या विविध भागांमध्ये दररोज 50 ते 55 फेऱ्या होत असतात. त्यातील अनेक बस ऐनवेळी बंद पडतात. तसेच, तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत चालक वेळेवर बस आणत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून विविध भागांतील बसच्या अनेक फेऱ्या रद्द होत आहेत. अचानक बंद पडणाऱ्या भाडेतत्त्वावरील बसमुळे पीएमपीचे वेळापत्रक कोलमडत असून, त्याचा भार महामंडळाच्या बसवर पडत आहे. डेपोतील कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी मागणी करूनही ठेकेदारांकडून चांगल्या बस मिळत नाहीत. त्याचबरोबर भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसवरील बेशिस्त चालकांची मुजोरी थांबविण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. 

याबाबत प्रवासी माया शेळके म्हणाल्या, ""बस ठेकेदारांच्या असोत की पीएमपीच्या; त्यातील मोडकळीस आलेल्या खिडक्‍या, खुर्च्या यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. तसेच, नवीन गाड्यांचे स्वयंचलित दरवाजे तांत्रिक अडचणींमुळे सुरळीत काम करीत नाहीत. गर्दीत बसमध्ये चढताना दरवाजा बंद असल्यास प्रवासी अडकून त्यांना इजा होण्याचे प्रकार घडले आहेत.'' 

"बंद पडणाऱ्या बसमुळे फेऱ्या कमी होतात. "पीएमपी' प्रशासनाने बसची संख्या वाढवायला हवी. बसची संख्या वाढल्यास प्रवाशांची धावपळ कमी होईल,'' असे प्रवासी रोहित इंदुलकर यांनी सांगितले. 

ठेकेदारांच्या बसमुळे पीएमपीचे संतुलन बिघडले आहे. त्यांच्या चालकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच, ठेकेदारांच्या बसमधून पुरेसे उत्पन्नही मिळत नाही, अशी माहिती महापालिका बस स्थानकावरील कर्मचारी काशिनाथ तेलंगे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT