पुणे

Video : Guys and Girls, एफसी रोड पुन्हा बहरलाय

सकाळवृत्तसेवा

पुणे : फर्ग्युसन कॉलेज रस्ता (एफसी रोड) हा पुण्यात प्रसिद्ध आहे तो येथील शॉपिंग, खाद्यपदार्थांसाठी. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये हा रस्ता मागील 2 महिन्यापासून निर्मनुष्य होता. आता लॉकडाउनमध्ये काही भागात शिथिलता आल्याने हा परिसर पुन्हा पूर्वीसारखा गजबजलेला दिसत आहे. 

फर्ग्युसन रस्त्याला खऱ्या अर्थाने सुरवात होते ती गुडलक चौकातून. येथील हॉटेल गुडलकवरून या चौकाला गुडलक चौक म्हणून ओळखले जाते. लॉकडाउनमध्ये अनेकांनी आपला हा कट्टा "मिस' केला. याच रस्त्यावर हॉटेल वैशाली, रूपाली, वाडेश्वर आहे. या हॉटेलमधील पार्सल सेवा सुरू झाली आहे. पार्सल देताना सामाजिक अंतर राहील याची पूर्ण काळजी हॉटेल चालकांकडून घेतली जात आहे. आपल्या आवडत्या हॉटेलमधील पदार्थ खायला मिळाल्याने खवय्ये देखील आनंदित आहेत. 
येथील एक आणखी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे हॉंगकॉंग लेन व स्ट्रीट शॉपिंग. आता येथील दुकानेही पूर्वी सारखी खुली झाली आहेत. मुलींची पावलेही इकडे वळू लागली आहेत. दुकानदार, ग्राहक स्वतःची काळजी घेताना दिसून येत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या रस्त्यावरील फर्ग्युसन महाविद्यालय व रानडे इन्स्टिट्यूटच्या बाहेर प्रवेश घेण्यासाठी पालक- विद्यार्थ्यांची होणारी गर्दी दिसत नसल्याने परिसर नेहमीपेक्षा थोडा शांत आहे. मात्र, विविध कारणास्तव या भागात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हळूहळू दोन्ही बाजूंना पार्किंग फूल होऊ लागली आहेत. लोक अंतर राखून चालत आहेत. थोडक्याीत एक सकारात्मक चित्र या रस्त्यावर तुम्हाला नक्की बघायला मिळेल. येथे फिरल्यावर करोनाची भीती नक्कीच थोडी कमी झाल्यासारखी वाटते. तुम्हाला तुमचा पूर्वीचा एफसी रोड गवसल्यासारखे नक्की वाटेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

घरात खूप कंटाळा आला होता. दुकान चालू झाल्याने आशेचा किरण दिसत आहे. पूर्वीसारखे गिऱ्हाईक येत नसले तरी दुकान चालू झाल्याचा आनंद आहे. 

- जावेद अख्तर, दुकान चालक 

तब्बल दोन महिन्यानंतर खरेदी करता येत आहे. योग्य खबरदारी घेतली तर नक्कीच आपल्याला कोरोनाला हरवता येईल. 

- लक्ष्मी भालेराव, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

"हम मजदूर आदमी हैं", मोहम्मद शमीने पुन्हा निवड समिती प्रमुख अजित आगरकरला टोमणा हाणला, आता हा वाद आणखी पेटणार?

Paithan Pachod Education News: पाचोडच्या शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रसेन कोठावळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

Latest Marathi News Live Update: MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला

'आता एवढंच राहिलं होतं!' कॉमेडियन समय रैनानं उडवडी बिग बी अमिताभ बच्चन यांची खिल्ली, म्हणाला...'पोलिओच्या जाहिराती केल्या पण...'

SCROLL FOR NEXT